एक्स्प्लोर
...अन् विराट भर मैदानातच पुजारावर भडकला!
विशाखापट्टणम: विशाखापट्टणममध्ये सुरु असलेल्या भारत वि. इंग्लंडमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी फलंदाजी करताना चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीमध्ये धावा घेताना ताळमेळ कमी दिसून आला.
सामन्यातील 18व्या षटकात एकदा नव्हे तर जवळजवळ तीनदा कोहली आणि पुजारा यांच्यातील ताळमेळ बिघडला. त्यामुळे कर्णधार विराट मैदानातच पुजारा भडकला.
षटकातील पहिल्या चेंडूवर कोहली धाव घेतली. पण त्यावेळी खेळाडूनं झेप घेऊन चेंडू आडवला आणि किपरच्या दिशेनं फेकला. त्यावेळी पुजारानं डाईव्ह मारुन स्वत:ला रन आऊट होण्यापासून वाचवलं. त्यानंतर त्याच षटकात पुजारा दुसऱ्यांदा रन आऊट होता होता वाचला. दोन धावा घेण्याच्या नादात पुजाराच्या हातून बॅटच सुटली. त्यावेळी विराट पुजारावर भडकला अन् मैदानावरच त्यानं पुजाराला सुनावलं.
विराट दुसरी धाव घेण्यासाठी तयार नव्हता. पण, तोपर्यंत पुजारा फार पुढे आला होता. विराटनं त्याला माघारी धाडलं. त्यावेळी त्याची बॅटही हातातून सुटली. अखेर पुजारा कसाबसा क्रिझमध्ये पोहचला.
एवढं झाल्यावरही पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा तसाच घोळ पाहायला मिळाला. या संपूर्ण प्रकारानं विराट प्रचंड रागावला होता. या प्रकारानंतर दोघांनी बराच वेळ एकमेकांशी बातचीत केली. त्यानंतर त्यांनी इंग्लंडला पुन्हा तशी संधी दिली नाही. पहिल्या डावात दोघांनीही शानदार शतकं झळकावली.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement