(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thomas Cup 2022: भारतानं थॉमस चषक जिंकला! पंतप्रधान मोदींकडून कौतुकाचा वर्षाव, विजयी संघाला एक कोटींचं बक्षीस
Thomas Cup 2022: बॅडमिंटनमध्ये भारतीय संघानं आज इतिहास रचला आहे. भारतानं 14 वेळा चॅम्पियन ठरलेल्या इंडोनेशियाचा पराभव करून पहिल्यांदाच थॉमस चषकावर नाव कोरलं.
Thomas Cup 2022: बॅडमिंटनमध्ये भारतीय संघानं आज इतिहास रचला आहे. भारतानं 14 वेळा चॅम्पियन ठरलेल्या इंडोनेशियाचा पराभव करून पहिल्यांदाच थॉमस चषकावर नाव कोरलं. तब्बल 73 वर्षानंतर भारतीय संघानं थॉमस चषक जिंकला आहे. भारतीय संघाच्या कामगिरीमुळं संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही भारतीय संघातील खेळाडूंचे अभिनंदन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून लिहिले की, "भारताच्या बॅडमिंटन संघाने इतिहास रचला आहे. भारतानं थॉमस चषक जिंकल्यानं संपूर्ण देश उत्सुक आहे. आमच्या संघाचं खूप खूप अभिनंदन आणि आगामी सामन्यांसाठी शुभेच्छा. यातून आपल्या येणाऱ्या पिढीलाही खूप प्रेरणा मिळेल", असंही मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींचं ट्वीट-
73 वर्षानंतर भारतानं थॉमस चषक जिंकला
आतापर्यंत इंडोनेशियानं सर्वाधिक 14 वेळा, चीननं 10 वेळा, मलेशियानं 5 वेळा तर, जपान आणि डेन्मार्क यांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ज्यानंतर यंदा 2022 साली भारताने या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत इतिहास घडवला आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणारा भारत जगातील सहावा देश बनला आहे. या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघानं सुरुवातीपासून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी आधी डेन्मार्कला सेमीफायनलमध्ये मात दिल्यानंतर अंतिम सामन्यात इंडोनेशियाला सुरुवातीच्या तीन सामन्यात मात दिली.
भारताच्या विजयाच्या शिल्पकार
या स्पर्धेतील पहिला सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं जिंकला. त्याने इंडोनेशियाच्या अँथॉनी गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने इंडोनेशियाच्या मुहम्मद एहसान आणि केविन संजया यांना 18-21, 23-21, 21-19, अशा फरकानं मात दिली. ज्यानंतर तिसऱ्या सामन्यात किंदम्बी श्रीकांतनं (kidambi srikanth) इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीला 21-15, 22-21 च्या फरकानं मात देऊन चषकावर नाव कोरलं.
हे देखील वाचा-