Taapsee Pannu : भारतीय बॅडमिंटन संघाची ऐतिहासिक कामगिरी, तापसीचा बॉयफ्रेंड आहे संघाचा कोच, विजयानंतर अभिनेत्री म्हणाली...
Taapsee Pannu : थॉमस कपच्या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
Taapsee Pannu : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिची मतं ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असते. आता तापसीने भारतीय पुरुष भारतीय बॅडमिंटन संघाचे जाहीर कौतुक केलं आहे. तापसीने सोशल मीडियावर भारतीय बॅडमिंटन संघाचा व्हिडीओ शेअर केला आहे. भारतीय बॅडमिंटन संघाचा कोच (Mathias Boe) तापसीचा बॉयफ्रेंड आहे.
थॉमस कपच्या अंतिम सामन्यात भारताने इंडोनेशियाविरुद्ध 5 पैकी पहिले 3 सामने जिंकत कपवर नाव कोरलं आहे. त्यामुळेच तापसीने व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, भारताने इतिहासात पहिल्यांदाच थॉमस कपवर नाव कोरंल आहे. मुलांनो खूपच चांगला पराक्रम केला आहात. तसेच तापसीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, थॉमस कपच्या अंतिम सामन्यात मुलांनी भारतासाठी विजय मिळवला आहे.
भारताने जिंकला थॉमस कप
आतापर्यंत सर्वाधिक 14 वेळा इंडोनेशियाने, 10 वेळा चीनने, मलेशियाने 5 वेळा तर जपान आणि डेन्मार्क यांनी एक-एक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ज्यानंतर यंदा 2022 साली भारताने या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत पहिलं वहिला चषक मिळवला आहे. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणार भारत जगातील सहावा देश बनला आहे. यंदा भारतीय बॅडमिंटन संघाने सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी सुरु ठेवली. त्यांनी आधी डेन्मार्कला सेमीफायनलमध्ये मात दिल्यानंतर अंतिम सामन्यात इंडोनेशियाला सुरुवातीच्या तीन सामन्यात मात दिली.
यावेळी सर्वात आधी स्पर्धेतील पहिला सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने (Lakshya Sen) जिंकला. त्याने इंडोनेशियाच्या अँथॉनी गिंटिंगचा 8-21, 21-17 आणि 21-16 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने इंडोनेशियाच्या मुहम्मद एहसान आणि केविन संजया यांना 18-21, 23-21, 21-19, अशा फरकाने मात दिली. ज्यानंतर तिसऱ्या सामन्यात किंदम्बी श्रीकांतने (kidambi srikanth) इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीला 21-15, 22-21 च्या फरकाने मात देत सामना आणि कप भारताच्या नावे केला आहे.
तापसी पन्नूचे आगामी सिनेमे
तापसी पन्नू या वर्षात अनेक सिनेमांत दिसणार आहे. तापसी लवकरच 'शाबास मिट्टू' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तापसी मिताली राजचे पात्र साकारणार आहे. प्रिया अवान यांनी या सिनेमाचे लेखन केलं असून राहुल ढोकलियाने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमा व्यतिरिक्त तापसी 'ब्लर', 'दो बारा', 'वो लडकी है कहां', 'तडका' यांसारख्या सिनेमांतदेखील दिसून येणार आहे.
संबंधित बातम्या