एक्स्प्लोर

'डेडमॅन' अंडरटेकरचा WWE ला अलविदा!

मुंबई: डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगणातील 'डेडमॅन' अर्थात अंडरटेकरने अखेर निवृत्ती घेतली आहे. अंडरटेकरच्या निवृत्तीनंतर सोशल मीडियाने त्याला अनोखं अभिवादन केलं. नव्वदच्या दशकापासून ते आजपर्यंत टीव्हीसमोर मुठ्या आवळून हाणामारीचा खेळ पाहणाऱ्यांसाठी अंडरटेकर हे नाव नवं नाही. या काळातील मुलांना डब्ल्यूडब्ल्यूई हा शो खेळापेक्षाही खूप मोठा आहे. त्यातील अंडरटेकर हे नाव तर सर्वांना परिचीत आहे. वेगवेगळ्या रेसलर्सचे कार्ड जमवणं, गेम खेळणं किंवा तासानतास टीव्हीसमोर फाईट बघत राहणं हा या दशकातील मुलांचा आवडता छंद. कदाचित क्रिकेटनंतर किंवा क्रिकेटसोबत सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणून डब्ल्यूडब्ल्यूईकडे पाहिलं जात असावं. Undertaker केज मॅच, लास्ट मॅन स्टँडिंग, स्लेज हॅमर, रेसलमेनिया, टॅग टीम चॅम्पियन, रॉ, स्मॅकडाऊन यासारख्या चॅम्पिन्सशीप तर पोरांना तोंड पाठ आहेत. जॉन सिना, रे मेस्टिरो, बिग शो, स्टोन कोल्ड, केन, शॉन मायकल, ट्रिपल एच, रॅन्डी ऑर्टन, बटिस्टा ही नावं तर कोणीही विसरु शकणार नाही. मात्र या सर्वात अंडरटेकर हे नाव धडकी भरवणारंच होतं. अंडरटेकर का खास होता? अंडरटेकर रिंगमध्ये उतरला आणि तो जिंकला नाही, हे क्वचितच दिसलं असेल. अंडरटेकर रिंगमध्ये येण्यापूर्वी होणारा अंधार, मग निळी लाईट आणि वाजणारी घंटा यामुळे रिंगमधील विरोधी रेसलरची आणि उपस्थित प्रेक्षकांचीही धाकधूक वाढायची. अंडरटेकरची सिग्नेचर ट्यून आजही अनेकांची मोबाईल रिंगटोन आहे. अंधारच त्याची ओळख होती. डेडमॅन' अंडरटेकरचा WWE ला अलविदा! ज्यावेळी रेसलर्स आपल्यासोबत सुंदर 'हसिना' घेऊन यायचे, त्यावेळी अंडरटेकरची एण्ट्री शवपेटीतून व्हायची. अंडरटेकर मार खाऊन पडला की लोक समजायचे हा थोड्यावेळाने उठणार आणि विरोधी रेसलरला शेवटी एकाच ठोशात हरवणार. हे व्हायचही तसंच. मग एकच जल्लोष सुरु व्हायचा. कोण आहे अंडरटेकर? द अंडरटेकर हे नाव वेगळं पण लक्षात राहणारं आहे. मात्र WWE च्या रिंगबाहेरचं त्याचं जग कसं आहे, हे मात्र बहुतेकांना माहित नाही. अंडरटेकरचं खरं नाव मार्क विलियम कॅल्वे आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये 24 मार्च 1965 रोजी जन्मलेल्या मार्क कॅल्वेने टेक्सास विद्यापीठात स्पोर्ट्स मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. मार्क विलियम कॅल्वेने 1984 मध्ये वर्ल्ड क्लास चॅम्पियन्सशीप रेसलिंगमध्ये भाग घेतला. मग 1989 मध्ये 'मीन मार्क'च्या रुपात तो वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या रिंगमध्ये पोहोचला. त्यानंतर 1990 मध्ये मार्क विलियम कॅल्वेचा प्रवास तत्कालिन WWF च्या मंचावर सुरु झाला. डेडमॅन' अंडरटेकरचा WWE ला अलविदा! अंडरटेकरने आधी WWF मग WWE च्या रिंगमध्ये 27 वर्षे अधिराज्य गाजवलं. मात्र त्याने जेव्हा अलविदा केला, तेव्हा अंडरटेकर त्याच्या स्टाईलमध्ये परत यावा, तो रिंगमध्ये उतरावास अशीच भावना सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. शवपेटी ते बाईक एण्ट्री शवपेटीतून येणारा अंडरटेकरची सिग्नेचर ट्यून जशी धडकी भरवणारी होती, तशीच त्याची एण्ट्री जबरदस्त. शवपेटीतून येणार अंडरटेकर 2000-01 च्या काळात भारदस्त बुलेटमधून येऊ लागला. पण पुन्हा 2004 च्या दरम्यान त्याने जुनीच एण्ट्री कायम ठेवली. ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन WWE मध्ये अंडरटेकर आणि केन ही जोडी म्हणजे जय-वीरुच. कोणी त्यांना सख्खे भाऊ तर कोणी सावत्र भाऊ म्हणत होतं. WWE च्या स्टोरीलाईनमध्ये सुरुवातील केन आणि अंडरटेकर दुश्मन होते. मात्र नंतर दोघेही एकत्र आले आणि 'ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन' सुरु झालं. रिंगमध्ये किताब, तर रिंगबाहेर मनं जिंकली अंडरटेकरने रेसलमेनियात सलग 21 किताब पटकावले. मात्र त्याचा मोठा विजय म्हणजे प्रोफेशनल रेसर्सची आणि खासकरुन प्रेक्षकांची मनं जिकणं. ना चिटिंग, ना रडीचा डाव, यामुळे अंडरटेकर नेहमीच प्रेक्षकांच्या काळजात घर करुन राहिला. त्यामुळे अंडरटेकरच्या निवृत्तीमुळे अनेकांना अश्रू अनावर होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI : वेस्ट इंडिजचा दुसऱ्या टी 20 मध्ये भारतावर विजय, सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या चुकांचा पाढा वाचला
वेस्ट इंडिजचा दुसऱ्या टी 20 मध्ये भारतावर विजय, सुनील गावस्कर यांनी मॅचचा टर्निंग पॉईंट सांगितला, काय चुकले ते स्पष्ट केलं
IND vs WI 3rd ODI Playing XI : दोन बडे खेळाडू OUT, तर... एका पराभवानंतर उलथापालथीचे संकेत, तिसऱ्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI?
दोन बडे खेळाडू OUT, तर... एका पराभवानंतर उलथापालथीचे संकेत, तिसऱ्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI?
IND vs WI 2nd T20 : गोलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त... रांचीतील पराभवानंतर गौतम गंभीरचा पारा चढला, नेमका राग कुणावर?
गोलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त... रांचीतील पराभवानंतर गौतम गंभीरचा पारा चढला, नेमका राग कुणावर?
AB De Villiers : जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं
जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Embed widget