एक्स्प्लोर
तब्बल 11 वर्षांनंतर धोनीच्या या विक्रमाशी विराटची बरोबरी
धोनीच्या नेतृत्त्वात भारताने यापूर्वी सलग 9 वन डे सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर विराट कोहलीने आता या विक्रमाची बरोबरी केली आहे.
![तब्बल 11 वर्षांनंतर धोनीच्या या विक्रमाशी विराटची बरोबरी Team India Won Consecutive 9 One Day In Virats Captaincy Latest Updates तब्बल 11 वर्षांनंतर धोनीच्या या विक्रमाशी विराटची बरोबरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/24220135/VIRAT-DHONI.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
इंदूर : कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने इंदूरच्या तिसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवला. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली.
विराट कोहलीच्या नेतृत्त्वात मिळवलेला हा सलग नववा विजय ठरला. भारतीय कर्णधारांच्या सलग वन डे सामने जिंकण्याच्या यादीत धोनीच्या नावावरही एवढेच सामने आहेत. म्हणजेच विराट कोहलीने 11 वर्षांनंतर धोनीच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
धोनीने नोव्हेंबर 2008 ते फेब्रुवारी 2009 या काळात सलग नऊ वन डे सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच विराट कोहलीने यावर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात सलग नऊ वन डे सामन्यांमध्ये विजय मिळवला.
सलग सर्वाधिक वन डे जिंकणाऱ्या देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया अव्वल आहे. ऑस्ट्रेलियाने सलग सर्वाधिक 21, दक्षिण आफ्रिकेने दोन वेळा 12, पाकिस्तान 12 आणि वेस्ट इंडिजने सलग 11 वन डे सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
संबंधित बातमी : ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्स राखून मात, वन डे मालिकाही भारताच्या खिशात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
बीड
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)