एक्स्प्लोर
Advertisement
INDvsNZ LIVE: भारताला मोठा धक्का, 86 धावांच्या खेळीनंतर पुजारा बाद
अपडेटः
भारताला मोठा धक्का, 86 धावांच्या खेळीनंतर पुजारा बाद
पुजाराचं नाबाद अर्धशतक, रहाणे-पुजाराने डाव सावरला
भारतः 109/3, पुजारा- 51*, रहाणे- 34*
मुरली विजय आणि विराट कोहली स्वस्तात बाद
भारताला पहिला झटका, शिखर धवन एक धाव करुन तंबूत
टीम इंडियात दोन बदल, केएल राहुल ऐवजी, धवनला संधी, तर उमेश यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी
दुसऱ्या कसोटीत गौतम गंभीरला संधी नाहीच, गंभीरऐवजी शिखर धवनला संधी
भारताचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
------------------------------------
कोलकाताः भारत आणि न्यूझीलंड संघांमधला दुसरा कसोटी सामना आजपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात येईल. भारतीय भूमीवरचा हा अडीचशेवा कसोटी सामना असून, विराट कोहलीची टीम इंडिया ही कसोटी जिंकण्याच्याच इराद्याने मैदानात उतरणार आहे.
ईडन गार्डन्सवरची ही कसोटी जिंकून आयसीसी क्रमवारीत निर्विवादरित्या नंबर वन मिळवण्याची भारताला संधी आहे. भारतीय संघाने कानपूरच्या पहिल्या कसोटीत किवींचा 197 धावांनी धुव्वा उडवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्या कामगिरीने टीम इंडियाला आयसीसी कसोटी क्रमवारीत पाकिस्तानसह संयुक्तरित्या अव्वल स्थान मिळवून दिलं होतं.
शिखर धवन की गौतम गंभीर?
कोलकाता कसोटीत धवन आणि गंभीर या दोघांपैकी कुणाला सलामीला खेळवायचं असा सवाल भारतीय संघव्यवस्थापनासमोर आहे. कानपूर कसोटीत भारताला चांगली सुरुवात करून देणारा लोकेश राहुल मांडीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतूनच आऊट झाला आहे. त्याच्या अनुपस्थितीत गौतम गंभीरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. पण त्याआधीपासूनच शिखर धवनचा पंधरासदस्यीय भारतीय संघात समावेश आहे.
धवनला गेल्या वर्षभरात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावता आलेली नाही. दुसरीकडे गौतम गंभीरने मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गेल्या पाच सामन्यांत पाच अर्धशतकं ठोकली आहेत. आता दिल्लीच्या या दोन डावखुऱ्या फलंदाजांमधून कोलकात्यात खेळण्याची संधी कोणाला मिळते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
बीड
बीड
Advertisement