एक्स्प्लोर

भारतीय क्रिकेटमध्ये उद्यापासून नव्या अध्यायाला सुरुवात, ईडन गार्डन्सवर पहिली डे-नाईट कसोटी

सौरव गांगुलीनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली आणि अवघ्या महिनाभरातच दादानं डे-नाईट कसोटी खेळवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ या कसोटीच्या निमित्तानं पहिल्यांदाच डे-नाईट कसोटी खेळणार आहेत.

कोलकाता : भारतीय क्रिकेटमध्ये होतेय एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. हा नवा अध्याय लिहिला जाणार आहे कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर. भारत आणि बांगलादेश संघांमध्ये मालिकेतला दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळवला जातोय आणि हा कसोटी सामना भारतात पहिल्यांदाच डे-नाईट खेळवला जाणार आहे. 2015 साली डे नाईट कसोटी क्रिकेटचा जन्म झाल्यापासून भारतात एकही सामना खेळवण्यात आला नव्हता. पण सौरव गांगुलीनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली आणि अवघ्या महिनाभरातच दादानं डे-नाईट कसोटी खेळवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ या कसोटीच्या निमित्तानं पहिल्यांदाच डे-नाईट कसोटी खेळणार आहेत. 2015 च्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेनंतर टी20 फॉरमॅट लोकप्रिय होत गेलं आणि साहजिकच त्याचा परिणाम कसोटी क्रिकेटवर झाला. 2015 साली आयसीसीने कसोटी क्रिकेटला चालना देण्यासाठी डे नाइट कसोटीची संकल्पना मांडली आणि नोव्हेंबर 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात गुलाबी चेंडूवर पहिली डे नाईट कसोटी खेळवण्यात आली. कोलकाता कसोटी ही आजवरची 12 वी डे नाईट कसोटी ठरणार आहे. आयसीसी कसोटी मान्यता असलेल्या 12पैकी आठ देशांनी डे नाईट कसोटी खेळली आहे. त्यात ऑस्ट्रेलियानं पाच, इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका संघांनी प्रत्येकी तीन, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडनं प्रत्येकी 2 आणि झिम्बाब्वेनं एकदा डे नाईट कसोटी खेळली आहे. डे-नाईट कसोटी ही गुलाबी चेंडूवर खेळवली जाते. भारत आणि बांगलादेश पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर खेळत असल्यानं दोन्ही संघातील फलंदाजांचा कस लागणार आहे. टीम इंडियाच्या चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवला दुलीप करंडकात गुलाबी चेंडूवर खेळण्याचा अनुभव आहे. पण त्याला आता तीन वर्ष लोटली आहेत. त्यासोबतच संधीप्रकाश, दव, सरावासाठी मिळालेला कमी वेळ यामुळे टीम इंडियासमोरचं आव्हान नक्कीच सोपं नसेल. कसा होईल हा सामना दुपारी एक वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिलं सत्र: दुपारी 1  ते 3 उपाहाराची वेळ : दुपारी 3 ते 3.40 दुसरं सत्र: 3.40 ते 5.40 चहापानाची वेळ: संध्याकाळी 5.40 ते 6 तिसरं सत्र: संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत

महत्त्वाच्या बातम्या

अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
Hardik Pandya : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये दाखल होताच पहिली पोस्ट, हार्दिक नव्या टीमच्या कर्णधाराचं नाव जाहीर करत म्हणाला...
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये दाखल, पहिल्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये पंजाबच्या चाहत्यांची मनं जिंकली
Hardik Pandya and Arshdeep Singh Trade: मोठी बातमी : IPL मध्ये सर्वात मोठा उलटफेर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर, तर अर्शदीप सिंगची एन्ट्री!
मोठी बातमी : IPL मध्ये सर्वात मोठा उलटफेर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर, तर अर्शदीप सिंगची एन्ट्री!
Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविंचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविंचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
Embed widget