Rohit Sharma and Virat Kohli : यशस्वी अन् शिवमचा मैदानातील धुमाकूळ पाहून जगाला धडकी भरवणारे रोहित-विराट पाहतच राहिले!
दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 15.4 षटकात 6 गडी गमावून विजय मिळवला. शिवम आणि यशस्वीने केलेल्या फटकेबाजीने रोहित शर्मा आणि कोहली सुद्धा अवाक् होऊन गेले होते.
Rohit Sharma and Virat Kohli : टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबेनं केलेल्या धुवाँधार फटकेबाजीनं एकतर्फी विजय मिळवताना मालिकाही खिशात घातली. दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 15.4 षटकात 6 गडी गमावून विजय मिळवला. शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वालने केलेल्या फटकेबाजीने कॅप्टन रोहित शर्मा आणि किंग कोहली सुद्धा अवाक् होऊन गेले होते.
Virat Kohli and Rohit Sharma enjoying the Dube Jaiswal show. pic.twitter.com/kV93c6krTG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 14, 2024
टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार पूर्णतः यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे राहिले. इंदुरच्या मैदानात दोघांनी षटकार अन् चौकारांची अक्षरश: आतषबाजी केली. यशस्वी जैस्वालने अवघ्या 34 चेंडूत 68 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल सहा सिक्स आणि पाच चौकार मारले. शिवम दुबेनेही सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी तडाखा दिला. त्याने अवघ्या 32 चेंडूत नाबाद 63 धावांची खेळी केली. त्याने सुद्धा पाच चौकार आणि चार षटकार ठोकले. त्यामुळे टीम इंडियाला 173 धावांचे आव्हान सहजपणे पार करता आले. शिवम दुबेनं तीन चेंडून तीन षटकार ठोकत मैदान दणाणून सोडले.
#TeamIndia win the 2nd T20I by 6 wickets, take an unassailable lead of 2-0 in the series.
— BCCI (@BCCI) January 14, 2024
Scorecard - https://t.co/CWSAhSZc45 #INDvAFG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/OQ10nOPFs7
अफगाण खेळाडू शिबम दुबेची बॅट तपासताना दिसला!
दुसरीकडे, बीसीसीआयने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध शिवम दुबेचा विजयी शॉट व्हिडिओमध्ये दिसून येतो. यानंतर कॅमेरा डगआउटकडे जातो. तेव्हा विराट कोहली आणि शुभमन गिलसह अनेक भारतीय खेळाडू दिसून येतात. यशस्वी आणि शिवम दुबेच्या खेळीने टीम इंडियाचा एकतर्फी विजय पाहून सर्व खेळाडूंना हसू आवरलं नाही. शेवटी अफगाणिस्तानचा खेळाडू शिबम दुबेची बॅट सुद्धा तपासताना दिसला.
3 consecutive monstrous sixes of Shivam Dube.pic.twitter.com/G9I3NRCUoS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 14, 2024
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ 20 षटकात 172 धावांवर सर्वबाद झाला. गुलबदिनने संघासाठी 57 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. अन्य एकाही फलंदाजाला मोठे योगदान देता आले नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 15.4 षटकांत 4 गडी राखून विजय मिळवला.
इतर महत्वाच्या बातम्या