एक्स्प्लोर

IND vs AFG 2nd T20 Highlights : यशस्वी अन् शिवम दुबेच्या तुफानी वादळात अफगाणिस्तानची अक्षरश: धुळदाण; टीम इंडियाने मालिका जिंकली!

IND vs AFG 2nd T20 Match Highlights : या विजयाचे शिल्पकार पूर्णतः यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे राहिले. दोघांनी षटकार अन् चौकारांची आतषबाजी केली. यशस्वीने अवघ्या 34 चेंडूत 68 धावांची खेळी केली.

इंदूर : अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या टी-20 वर्ल्डकप पूर्वी टीम इंडियाने प्रबळ आत्मविश्वास मिळवताना अफगाणिस्तानची धुळदाण उडवत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली. आज (14 जानेवारी) इंदूर येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा सहा विकेटसने पराभव केला. शिवम दुबेनं सलग दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू खेळी केली. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

या विजयाचे शिल्पकार पूर्णतः यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे राहिले. दोघांनी षटकार अन् चौकारांची आतषबाजी केली. यशस्वीने अवघ्या 34 चेंडूत 68 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल सहा सिक्स आणि  पाच चौकार मारले. शिवम दुबेनेही सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने अवघ्या 32 चेंडूत नाबाद 63 धावांची खेळी केली. त्याने पाच चौकार आणि चार षटकार ठोकले. त्यामुळे टीम इंडियाला 173 धावांचे आव्हान सहजपणे पार करता आले. या सामन्यात रोहित शर्माकडून निराशा झाली. तो पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. 

यानंतर तिसऱ्या क्रमांकावर किंग कोहली मैदानात आला. त्याने दुसऱ्याच चेंडूवर क्लासिक ड्राईव्ह करत इरादा स्पष्ट केला. कोहली 16 चेंडूत 5 चौकारांसह 29 धावा करून  बाद झाला. त्याला नावीनने बाद केले. त्याचा एक चौकार वर्ल्डकपमधील पाकिस्तानच्या हॅरिस रौफला मारलेल्या सिक्सची आठवण करून देणारा होता. किंचित अंतराने तो चौकार ठरला. यानंतर यशस्वी आणि शिवमने मैदानात चौकार आणि षटकारांची बरसात करत विजय आवाक्यात आणला. यशस्वी बाद झाल्यानंतर जितेशही बाद झाला. त्यानंतर विजयाची औपचारिकता शिवम आणि रिंकू सिंहने पूर्ण केली.

तत्पूर्वी, अफगाण फलंदाजांनी दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजी फोडून काढताना 20 षटकांत 172 धावा केल्या.टीम इंडियासमोर मालिका विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य दिले. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नईबने 35 चेंडूत सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. नजीबुल्लाह, करीम जन्नत आणि मुजीब उर रहमान यांनी अखेरच्या षटकांमध्ये उपयुक्त खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. शिवम दुबेने 1 बळी आपल्या नावावर केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra Update : येत्या ३१ मार्च रोजी कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर राहणारABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 28 March 2025Disha Salian Case News : दिशा सालियन प्रकरणावरुन राजकीय घमासान, सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणाले?Sugriv Karad News : कोण आहे सुग्रीव कराड? संतोश देशमुख हत्या प्रकरणाशी काय आहे संबंध?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
DA Hike News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, 7 वर्षातील सर्वात कमी वाढ, पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, पगार किती रुपयांनी वाढला?
Embed widget