एक्स्प्लोर
हैदराबादने विजयाचं खातं उघडलं, संजू सॅमसनचं शानदार शतक व्यर्थ
राजस्थान रॉयल्सने 198 धावांचा डोंगर उभारल्यानंतरही सनरायझर्स हैदराबादने आजचा सामना जिंकला आहे.
हैदराबाद : राजस्थान रॉयल्सने 198 धावांचा डोंगर उभारल्यानंतरही सनरायझर्स हैदराबादने आजचा सामना जिंकला. हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरने 37 चेंडूत 69 धावा केल्या. सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्टॉ याने 28 चेंडूत 45 धावा करत वॉर्नला चांगली साथ दिली. 19 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रशीद खान याने उत्तुंग षटकार मारत सामना जिंकला. पाच गडी आणि एक षटक राखून हैदराबादने आजचा सामना जिंकला. या विजयामुळे हैदराबादने गुणांचं खातं उघडलं आहे.
तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनीदेखील उत्तम खेळाचे प्रदर्शन घडवत 2 बाद 198 धावांचा डोंगर उभारला होता. कर्णधार अजिंक्य रहाणे याने 49 चेंडूत 70 धावांची खेळी केली, तर संजू सॅमसन याने 55 चेंडूत 102 धावा केल्या. संजूचे शतक यंदाच्या आयपीएलमधले पहिले शतक ठरले आहे. त्याच्या या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
A brilliant shot to finish the innings from @rashidkhan_19
The @SunRisers win by 5 wickets #SRHvRR pic.twitter.com/kGm5HqIWXy — IndianPremierLeague (@IPL) March 29, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement