ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न यांने आपली टी 20ची ड्रिम टीम तयार केली आहे. या टीममध्ये 2015मधील टी 20चा विश्व चषक जिंकणाऱ्या वेस्टी इंडीजच्या चार खेळाडूंचा समावेश आहे.
2/6
गोलंदाजीची जबाबदारी ऑस्ट्रेलियाच्या मायकेल स्टारक, वेस्ट इंडीजच्या सुनिल नारेन आणि बांग्लादेशच्या मुस्तफीजुर रेहमान यांना देण्यात आली आहे.
3/6
या टीममध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर, यानंतर एबी डिव्हीलर्स, शेन वॉटसन, आंद्रे रसेल, ड्वेन ब्रावो याचा क्रमांक आहे. विकेट किपर म्हणून इंग्लंडच्या जोस बटलर याचा समावेश आहे.
4/6
या टीममध्ये वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल आणि न्यूझीलंडच्या ब्रॅन्डन मॅक्कुलन याचा सलामीचे फलंदाज म्हणून समावेश आहे.
5/6
वॉर्नच्या टीममध्ये वेस्ट इंडीजचे चार, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी दोन, तर भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, आणि बांग्लादेशच्या प्रत्येकी एका क्रिकेटपटूचा समावेश आहे.
6/6
त्याने आपल्या टीममध्ये अनेक अष्टपैलु क्रिकेटपटूंचा समावेश केला आहे. पण या ड्रिम टीममधून अनेक दिग्गज क्रिकेटपटू वगळली आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि आर. अश्विन यांचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.