एक्स्प्लोर
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी टीमकडून हसीन जहांचीही चौकशी
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहां हिची देखील आज (शनिवार) बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी टीमने चौकशी केली.
कोलकाता : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहां हिची देखील आज (शनिवार) बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी टीमने चौकशी केली. हसीनसोबतच तिच्या वडिलांची आणि दोन बहिणींची चौकशी करण्यात आली. हसीनने काही दिवसांपूर्वीच शमीवर मॅच फिक्सिंगचेही आरोप केले होते.
हसीनने मॅच फिक्सिंगचे आरोप केल्यानंतर बीसीसीआयने शमीला आपल्या कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून वगळलं होतं. त्यामुळे आता एसीयू रिपोर्टनंतरच शमीच्या कॉन्ट्रॅक्टवर निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, हसीनचे हे आरोप निराधार असल्याचं शमीनं म्हटलं आहे. एबीपी न्यूजशी बातचीत करताना शमी म्हणाला की, 'आमचं नातं राहिल की नाही, याविषयी आता मी आशा सोडून दिली आहे.'
शमीचा मॅच फिक्सिंगमध्ये हात? पत्नी हसीन जहाँच्या आरोपांनी खळबळ
“शमीने पाकिस्तानातील एका तरुणीकडून पैसे घेतले, जे इंग्लंडहून पाठवण्यात आले होते. ते पैसे का पाठवण्यात आले होते? बीसीसीआयने बुक केलेल्या हॉटेलमध्ये एखादी अनोळखी तरुणी कशी पोहोचते?”, असे गंभीर प्रश्न हसीनने उपस्थित केले आहेत.
“पाकिस्तानातील कराचीमध्ये राहणाऱ्या त्या तरुणीला शमी बोलवतो. तिच्यासाठी खास रुम बुक करतो. तिच्यासोबत त्याचे संबंध आहेत. तिच्यामार्फत इंग्लंडमधील कुणीतरी मोहम्मद भाईने पैसे पाठवल्याचे तो सांगतो. मात्र ते पैसे कसले आहेत, का दिले, याची माहिती त्याने मला अद्याप कधीच सांगितले नाही.”, असेही हसनीने एबीपी न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.
“अल्ला करो नि असे होऊ नये, पण तो काहीतरी फ्रॉड करु शकतो, तो देशासोबतही गद्दारी करु शकतो. माझ्याकडे पुरावे आहेत. तुम्हीही दुबईत त्या हॉटेलमध्ये जाऊन पाहू शकता की, त्याने सिंगल अॅडल्टच्या नावे बुकिंग केली होती की नाही. कोणत्या गोष्टीचे शमीने पैसे घेतले? शमीसोबत मी बोलले, त्यावेळेचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, ज्यात त्याने पैसे घेतल्याचे मान्य केले आहे.”, असे हसीनने सांगितले.
संबंधित बातम्या :
फोन हरवल्यापासून शमी चांगलं वागायला लागला : हसीन जहा
पहिलं लग्न ते चीअर लीडर, शमीची पत्नी हसीनची कहाणी
पत्नीच्या सर्व आरोपांवर मोहम्मद शमीचं उत्तर, EXCLUSIVE मुलाखत
ती अत्यंत महत्त्वकांक्षी महिला, हसीन जहाच्या पहिल्या पतीचं वक्तव्य
शमीचा मॅच फिक्सिंगमध्ये हात? पत्नी हसीन जहाँच्या आरोपांनी खळबळ
शमीविरुद्ध माझ्याकडे पुरावे, आता त्याला कोर्टातच खेचेन : हसीन जहां
बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून शमीचं नाव वगळलं
VIDEO : थेट कॅमेऱ्यासमोर येत हसिन जहांचे शमीवर गंभीर आरोप
पत्नीच्या आरोपांवर मोहम्मद शमीचं स्पष्टीकरण
मोहम्मद शमीवरील आरोपांवर बीसीसीआयची प्रतिक्रिया
अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
पुणे
नाशिक
Advertisement