एक्स्प्लोर
डेव्हिस चषक : भारताला दक्षिण कोरियावर 2-0 ने आघाडी
![डेव्हिस चषक : भारताला दक्षिण कोरियावर 2-0 ने आघाडी Saketh Shows Exemplary Grit India Lead 2 0 In Davis Cup डेव्हिस चषक : भारताला दक्षिण कोरियावर 2-0 ने आघाडी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/15124331/Davis-Cup-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चंदीगड : चंदीगडमध्ये डेव्हिस चषकाच्या लढतीत दुसऱ्या एकेरी सामन्यात साकेत मायनेनीनं दक्षिण कोरियाच्या योंग क्यू लिमवर 6-1, 3-6, 6-4, 3-6, 5-2 अशी मात केली आणि भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.
आशिया ओशनिया ग्रुप वन ची ही लढत हरयाणा टेनिस असोसिएशनच्या ग्रास कोर्टवर खेळवली जात आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी दक्षिण कोरियाच्या सेआँग चॅन हाँगनं पहिल्या एकेरी लढतीतून माघार घेतल्यामुळे भारताच्या रामकुमार रामनाथननं 6-3 2-6 6-3 6-5 असा विजय मिळवला आणि भारताचं खातं उघडलं होतं.
त्यानंतर साकेत मायनेनीनं दुसरा एकेरी सामना जिंकून भारताला सुस्थितीत नेलं. या लढतीतला दुहेरीचा सामना उद्या खेळवला जाणार असून, लिअँडर पेस आणि रोहन बोपण्णा त्यात सहभागी होतील.
रिओ ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर पेस आणि बोपण्णा या लढतीत काय कामगिरी बजावतात, यावर सर्वांची नजर राहील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)