Saina Nehwal- Parupalli Kashyap : क्षणभर दुरावलं, पण नातं तुटलं नाही! घटस्फोटनंतर 20 दिवसांत सायना नेहवालचा यू-टर्न, पती पारुपल्ली कश्यपसोबत केलं 'पॅच-अप'
Saina Nehwal- Parupalli Kashyap U-turn on divorce : स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अलीकडेच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Saina Nehwal- Parupalli Kashyap News : स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अलीकडेच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने पती परुपल्ली कश्यपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं आणि त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र अवघ्या 20 दिवसांच्या आता सायना आणि परुपल्ली पुन्हा एकदा त्यांच्या नात्याला दुसरी संधी देत आहेत.
‘कधी कधी अंतर तुम्हाला...’
सायना नेहवालने आपल्या या निर्णयाची माहिती सोशल मीडियावर दिली. तिने परुपल्ली कश्यपसोबतची एक फोटो शेअर करत लिहिलं, "कधी कधी अंतर तुम्हाला एखाद्याच्या उपस्थितीचं महत्त्व शिकवतं... घेऊया, पुन्हा एकदा प्रयत्न करू."
View this post on Instagram
13 जुलै रोजी दिली होती घटस्फोट होण्याची माहिती
13 जुलै रोजी सायनाने एक पोस्टद्वारे ती आणि कश्यप एकमेकांपासून वेगळे होत असल्याचं सांगितलं होतं. तिने लिहिलं होतं की, "आयुष्यात अनेकदा आपण वेगवेगळ्या दिशांना जातो. खूप विचार करून मी आणि परुपल्ली कश्यपने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आम्ही शांतता, प्रगती आणि मानसिक आराम निवडत आहोत. या प्रवासातील आठवणींसाठी मी आभारी आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. कृपया आमच्या खासगी आयुष्याचा सन्मान करा."
लग्नाआधी अनेक वर्षं केली होती डेट
आता हे दोघं पुन्हा आपल्या लग्नाला एक संधी देणार आहेत. सायना आणि परुपल्लीने 2018 साली लग्न केलं होतं. लग्नाआधी त्यांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं. दोघेही भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी हैदराबादमधील पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमीत एकत्र प्रशिक्षण घेतलं आणि एकत्रच खेळात प्रगती केली.
1997 पासून ओळख, 2004 मध्ये जवळीक
रिपोर्ट्सनुसार, सायना आणि परुपल्ली यांची ओळख 1997 पासून होती. 2004 मध्ये गोपीचंद यांनी हैदराबादमध्ये अकॅडमी सुरू केली आणि त्यावेळी दोघेही तिथे ट्रेनिंगसाठी गेले. इथूनच त्यांच्या जवळीकांना सुरुवात झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि अखेर 2018 मध्ये गुपचूपपणे दोघांनी लग्न केलं. त्यांच्या रिलेशनशिपची कोणालाही चाहूल लागली नव्हती. आता हे दोघं पुन्हा नव्यानं आपल्या नात्याची सुरूवात करत आहेत.
हे ही वाचा -
























