एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप-संघ पसरत आहे आणि खापर आपल्यावर फोडतोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray: “भाषेसाठी कोणी खून करावा, मारामारी करावी ही परिस्थितीच भयावह आहे. हा भाषिक प्रांतवाद सुरू झाला तो कुणाकडून?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray:  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्णव खैरेच्या आत्महत्येनंतर भाजपकडून आंदोलन करण्यात आल्यानंतर सडकून प्रहार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर भाषावाद आणि प्रांतवादाचा विष पसरवल्याचा आरोप करत हल्ला चढवला. भाजपच्या दुटप्पी राजकारणाला लोक समजू लागल्याचे ते म्हणाले. ठाकरे म्हणाले, जाणीवपूर्वक भाषावाद पेटवण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यामागे भाजप आणि संघाचे कपटकारस्थान आहे. “भाषावाद, प्रांतवादाचे विष हे भाजप-संघ पसरवत आहेत आणि खापर मात्र आमच्यावर फोडत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

तोडा, फोडा आणि राज्य करा हा त्यांचा अजेंडा 

घाटकोपरमधे संघाचे जोशी येऊन ‘माझी मातृभाषा गुजराती’ असल्याचे जाहीरपणे म्हणाले, याकडे लक्ष वेधत ठाकरे म्हणाले की, हे विष पसरवण्यामागे भाजप-संघच आहेत आणि त्याचे खापर आपल्यावर फोडत आहेत.“तोडा, फोडा आणि राज्य करा हा त्यांचा अजेंडा आहे; पण यातून आपल्या भूमिपुत्रांनी एकत्र राहून राज्य सांभाळायचं आहे,” असे त्यांनी नमूद केले. शिवसेनाच हे काम करू शकते, असा विश्वास जनतेला वाटतो, “मनगटात हिम्मत असेल, तर विजय दूर नसतो.” असे ते म्हणाले. 

पक्ष फोडतात तसेच आता घरेसुद्धा फोडण्याचा प्रयत्न 

ठाकरे म्हणाले की, काही जण शिवसेनेतून बाहेर गेले होते, पण आज त्याच परिसरातून डोंबिवलीतून भाजपचे काही नेते पुन्हा शिवसेनेत येत आहेत. “भाजप आणि गद्दार किती ढोंगी आहेत हे लोकांना उमगू लागलं आहे. जोशात येणं ठीक, पण आता डोळे उघडे ठेवून सगळं पाहण्याची वेळ आहे,” असा टोला त्यांनी लगावला. भाजप हा कपटकारस्थान करणारा पक्ष असल्याचे सांगत त्यांनी आरोप केला की, जसे ते पक्ष फोडतात तसेच आता घरेसुद्धा फोडण्याचा प्रयत्न त्यांचे नेते करत आहेत. पालघरमधील साधू हत्याकांडाचा उल्लेख करत त्यांनी भाजपची दुटप्पी भूमिका उघड केली. “ज्यावर आरोप केले त्यालाच भाजपने पदरात घेतले. हे पाप झाकलं जाईल असा त्यांना वाटलं, पण गोष्ट चव्हाट्यावर आल्यावर पक्षप्रवेश स्थगित केला,” अशी टीका ठाकरे यांनी केली.

‘मराठी माझी आई आहे, ती मेली तरी चालेल’ 

भाषिक प्रांतवादाबाबत ठाकरे म्हणाले की, कोणतीही भाषा दुसऱ्या भाषेवर अत्याचार करू नये. “भाषेसाठी कोणी खून करावा, मारामारी करावी ही परिस्थितीच भयावह आहे. हा भाषिक प्रांतवाद सुरू झाला तो कुणाकडून?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मागाठाण्याच्या आमदाराने केलेल्या ‘मराठी माझी आई आहे, ती मेली तरी चालेल’ या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी विचारले, “अशी मानसिकता असेल तर अपेक्षा तरी काय करायची?”

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
Nalasopara Crime : 'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार
'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Embed widget