एक्स्प्लोर

SEBI on Digital Gold : डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं होऊ शकतं नुकसान, सेबीकडून सावधानतेचा इशारा जारी...

Digital Gold : सेबीचे चेअरमन तुहिन कांत पांडे यांनी डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सावध केलं आहे. डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यापूर्वी सावधानता बाळगली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं.

Digital Gold नवी दिल्ली : सिक्यूरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीचे चेअरमन तुहिन कांत पांडे यांनी डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सावध केलं आहे. सेबीनं स्पष्ट केलं की डिजीटल गोल्डला सिक्यूरिटी मानलं जात नाही किंवा कमोडिटी डेरिवेटिव्सच्या अंतर्गत देखील ते येत नाही.

SEBI on Digital Gold : डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सेबीचा इशारा

सेबीच्या मते जर एखाद्या प्लॅटफॉर्मकडून रक्कम थकली तर अशा स्थितीत सेबीकडे गुंतवणूकदारांना सुरक्षित ठेवण्याचं कोणतंही साधन नाही. सेबीनं डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी पूर्णपणे सावध राहावं, असं म्हटलं आहे.

सेबीचे चेअरमन तुहिन कांत पांडे यांनी नॅशनल कॉन्क्लेव ऑन REITs अँड InvITs–2025 मध्ये याबाबत माहिती दिली. डिजीटल गोल्ड इंडस्ट्रीचं नियमन सेबीकडून केलं जात नाही. मात्र, यासंदर्भातील मागणी दीर्घ काळापासून केली जात आहे. तुहिन कांत पांडे यांनी गुंतवणूकदारांना म्हटलं की डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताना प्लॅटफॉर्म आणि त्याच्या अटींची पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे.

सेबी सध्या गोल्ड ईटीएफ आणि ट्रेडेबल गोल्ड सिक्यूरिटीजमध्ये केलेल्या सोन्यातील गुंतवणुकीचं नियमन करते. या दोन्हीतील गुंतवणूक सेबीच्या कक्षेत येते.

डिजीटल गोल्ड म्हणजे काय?

डिजीटल गोल्डची खरेदी पारंपरिक सोन्याप्रमाणं होत नाही. हा व्यवहार पूर्णपणे डिजीटल असतो. भारतात पेटीएम, फोन पे, गुगल पे गुंतवणूकदारांना डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देतात. 2021 मध्ये डिजीटल गोल्ड मार्केट 5000 कोटी रुपयांचं होतं. ते आता वाढून 13800 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

दरम्यान, सेबीनं डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला असला तरी प्रत्यक्ष सोन्यात ज्यांनी गुंतणूक केली त्यांना चांगला परतावा मिळालेला आहे. सोने आणि चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना 2025 मध्ये चांगला परतावा मिळाला आहे. कारण, 31 डिसेंबर 2024 ला 24 कॅरेट सोन्याचा दर 75000 रुपयांदरम्यान होता. सध्या सोनं 1 लाख 22 हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळं सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे. तर, चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील चांगला परतावा मिळाला आहे. चांदीचे दर 1 लाख  50 हजारांच्या पुढं पोहोचले आहेत. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Embed widget