एक्स्प्लोर

Amit Satam: संपलेलं राजकारण सुरु राहण्यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत; सद्‌बुद्धि द्या म्हणत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा ठाकरे बंधूंवर प्रहार

Amit Satam: भाजपकडून ठाकरे बंधूंविरोधात सद्‌बुद्धि द्या म्हणत आंदोलन करण्यात आले. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. 

Amit Satam: लोकल ट्रेनमध्ये चढताना हिंदीत बोलल्यानंतर तुला मराठी बोलता येत नाही का? यावरून झालेल्या वादानंतर 19 वर्षीय अर्णव खैरेनं आत्महत्या केली. या विद्यार्थ्याला मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलण्याची लाज वाटते का? असे विचारत मारहाण झाली होती. डोंबिवली ते ठाणे दरम्यान ही घटना घडली. मारहाणीनंतर अर्णव मानसिक तणावात होता. याच तणावातून या विद्यार्थ्याने कल्याणमध्ये आपल्या घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर आता भाजपकडून ठाकरे बंधूंविरोधात सद्‌बुद्धि द्या म्हणत आंदोलन करण्यात आले. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. 

'सद्बुद्धी द्या प्रार्थना आंदोलन'

मुंबईमध्ये ठाकरे बंधूंविरोधात भाजपकडून 'सद्बुद्धी द्या प्रार्थना आंदोलन' करण्यात आले. हे आंदोलन तोंडाला काळ्या फिती बांधून करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाच्या बाजूला जमून आंदोनल करण्यात आले. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम, आमदार अतुल भातकळकर,आणि मुंबईतील सर्व पदाधिकारी सहभागी झाले. "भाषा ही संपर्काचे माध्यम आहे संघर्षाचे नाही" असे फलक यावेळी हातामध्ये होते. 

संपलेला राजकारण आपलं सुरु राहावं यासाठी भाषावाद 

अमित साटम म्हणाले की, भाषा भाषांमध्ये वाद काही पक्ष करत आहेत. यामध्ये मराठी तरुणाला जीव गमवावा लागला.  संपलेलं राजकारण आपलं सुरु राहावं यासाठी भाषावाद, प्रांतवाद करत आहेत. काही पक्ष काही नेते हे राजकारण करत आहेत. त्यांना सुबुद्धी देवो यासाठी आम्ही येथे एकत्र आलो आहोत. माणसाने माणसाला माणसासम वागू द्या. बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावरुन या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना सुबुद्धी द्यावी, असे सांगितल्याचे ते म्हणाले.  माणसाने माणसाला माणसासम वागू द्या, असे साटम म्हणाले. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात अर्णवच्या वडील जितेंद्र यांनी जबाब नोंदवला असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी अर्णवच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अर्णवच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घटनेचा सखोल तपास करून या प्रकरणी मराठी तरुण आहेत की मराठी याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget