एक्स्प्लोर
बिर्याणी खायची आहे, रुस्तम पाहायचाय, पीव्ही सिंधूची इच्छा

रिओ दि जनैरो : भारताची 21 वर्षीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रौप्यपदक पटकावल्यानंतर तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधानांपासून सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारणाऱ्या सिंधूला मात्र मायदेशी परतण्याचे वेध लागले आहेत. इतकंच नाही तर अक्षयकुमारचा 'रुस्तम' पाहण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. हैदराबादच्या सिंधूचा हैदराबादी बिर्याणीवर ताव मारण्याचाही मनसुबा आहे. सोबतच तिचं आवडतं आईस्क्रिमही तिला खायचं आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी तिला जिभेचे चोचले बाजुला ठेवावे लागले होते. मात्र आता देशाची मान अभिमानाने उंचावल्यावर तिला पुन्हा एकदा चटक भागवायची आहे.
भारताच्या पीव्ही सिंधूला ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक
सिंधूला नवनवे सिनेमे पाहण्याची आणि खाण्यापिण्याची प्रचंड आवड आहे. ती रुस्तम आणि मोहेंजोदारो या चित्रपटांबद्दल विचारत होती, असंही तिच्या वडिलांनी सांगितलं. सिंधूला घरच्या जेवणाशिवाय इतर पदार्थांकडे ढुंकूनही पाहण्यास आम्ही मज्जाव केला, असं ते सांगतात.जर तुमचं नाव सिंधू आहे, तर मिळवा फ्री पिझ्झा!
क्रिकेटप्रेमी देशाला तू बॅडमिंटन पाहायला लावलंस, तू पदक मिळवणार हे माहितचं होतं, अशा शब्दात अक्षय कुमारने सिंधूचं कौतुक केलं होतं. सोबतच बॅडमिंटन कोर्टवर तिच्यासोबत खेळतानाचा फोटोही त्याने शेअर केला होता.सिंधू तू क्रिकेटप्रेमी देशाला बॅडमिंटन पाहायला लावलंस- अक्षय कुमार
पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरी बॅडमिंटनच्या अंतिम लढतीत वर्ल्ड नंबर वन कॅरोलिना मरिनशी मुकाबला केला. या सामन्यात सिंधूला पराभव स्वीकारावा लागला असला तरी तिने रौप्यपदकाची कमाई करत नवा इतिहास रचला आहे.संबंधित बातम्या :
तीन महिने माझ्याकडे मोबाइल नव्हता: सिंधू
पदक मिळेल असा विचारही केला नव्हता- पीव्ही सिंधू
आई माझा सिंधूसोबत फोटो आहे: सलमान खान
चॅम्पियन प्लेयर ते चॅम्पियन प्रशिक्षक : पुलेला गोपीचंद
सरावासाठी दररोज 56 किमी प्रवास, पीव्ही सिंधूच्या यशाची कहाणी
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























