Rohit Sharma & Sarfaraz Khan Viral Video : इथं हिरो होऊ नकोस पहिल्यांदा हेल्मेट घाल! रोहितचा एकाच वाक्यात सरफराजला 'कडक' इशारा
Rohit Sharma & Sarfaraz Khan Viral Video : तिसऱ्या दिवशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि सरफराज खान दिसत आहेत.
Rohit Sharma & Sarfaraz Khan Viral Video : रांची कसोटीत टीम इंडिया विजयाच्या जवळ आहे. भारतीय संघाला चौथ्या दिवशी विजयासाठी 152 धावा कराव्या लागणार आहेत. टीम इंडियासमोर विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या 40 धावा आहे. भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल नाबाद परतले. मात्र, तिसऱ्या दिवशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि सरफराज खान दिसत आहेत.
'अरे हिरो व्हायचं नाही'
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा युवा फलंदाज सर्फराज खानला इशारा देत आहे. व्हिडीओमध्ये रोहित शर्मा सरफराज खानला म्हणतो की, अरे हिरो व्हायचं नाही. यानंतर कॉमेंट्री करत असलेल्या दिनेश कार्तिकने संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. दिनेश कार्तिकने सांगितले, रोहित शर्मा सरफराज खानला असे का म्हणाला? खरंतर सरफराज खान हेल्मेटशिवाय शॉर्ट फिल्डिंग करत होता, पण सरफराज खानने कोणतीही रिस्क घेऊ नये अशी रोहित शर्माची इच्छा होती.
🔊 Hear this! Rohit does not want Sarfaraz to be a hero?🤔#INDvsENG #IDFCFirstBankTestSeries #BazBowled #JioCinemaSports pic.twitter.com/ZtIsnEZM67
— JioCinema (@JioCinema) February 25, 2024
मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया चौथ्या दिवशी उतरणार
रांची कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव 307 धावांवर आटोपला होता. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या आधारे ब्रिटीशांना 46 धावांची आघाडी मिळाली. यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 145 धावांवर आटोपला. अशाप्रकारे भारतीय संघाला 192 धावांचे लक्ष्य मिळाले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या 40 धावा झाली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा 24 धावा करून नाबाद परतला. यशस्वी जैस्वाल 16 धावा करून नाबाद आहे. आता भारतीय संघाला चौथ्या दिवशी 152 धावा कराव्या लागणार आहेत.
Rohit Sharma is a complete blockbuster in the field. 😄👌pic.twitter.com/7hO23QJV4U
— Johns. (@CricCrazyJohns) February 25, 2024
इतर महत्वाच्या बातम्या