India vs England, 4th Test : आश्विन आणि कुलदीपच्या फिरकीने टीम इंडियाने बाजी पलटली; नवखा धुव्र 'ताऱ्यासारखा' चमकला!
India vs England, 4th Test : इंग्लंडकडून सलामीवीर जॅक क्रॉलीने सर्वाधिक 60 धावा केल्या. मात्र बाकीच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स आणि बेन स्टोक्सने निराशा केली.
India vs England, 4th Test : दुसऱ्या दिवशी बॅकफूटवर गेलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी आर, आश्विन आणि कुलदीप यादवच्या फिरकीच्या जोरावर बाजी पलटली आहे. इंग्लंडचा दुसरा डाव दोघांनी अवघ्या 145 धावांमध्ये गुंडाळत टीम इंडियाची सामन्यात वापसी केली. तत्पूर्वी, ध्रुव जुरेलने केलेल्या 90 धावांच्या खेळीमुळे पहिल्या डावात टीम इंडियाला त्रिशतकी मजल मारता आली. त्याला कुलदीप यादवने संयमी साथ दिली.
भारताला विजयासाठी 152 धावांची गरज
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या आहेत. कॅप्टन रोहित शर्मा 24 आणि यशस्वी जैस्वाल 16 धावांवर नाबाद परतले. भारताला विजयासाठी चौथ्या दिवशी आणखी 152 धावा करायच्या आहेत. याआधी इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ 145 धावांवर गारद झाला होता. अशा स्थितीत भारतासमोर 192 धावांचे लक्ष्य झाले. भारताकडून दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने पाच आणि कुलदीप यादवने चार बळी घेतले.
रांची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ब्रिटीशांचा दुसरा डाव 145 धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडकडे 46 धावांची आघाडी होती. अशा प्रकारे भारतीय संघासमोर 192 धावांचे लक्ष्य आहे. भारताकडून आश्विन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. रवी अश्विनने इंग्लंडच्या 5 फलंदाजांना आपले बळी बनवले. तर कुलदीप यादवने 4 बळी घेतले. रवींद्र जडेजाने 1 विकेट आपल्या नावावर केली.
इंग्लिश फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूंसमोर गुडघे टेकले
इंग्लंडकडून सलामीवीर जॅक क्रॉलीने सर्वाधिक 60 धावा केल्या. मात्र बाकीच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स आणि बेन फोक्स यांसारख्या फलंदाजांनी निराशा केली. इंग्लंडच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. तत्पूर्वी, टीम इंडियाचा पहिला डाव 307 धावांवर आटोपला होता. इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे 46 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात जॅक क्रॉली चमकला
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर बेन डकेट 15 धावा करून बाद झाला. ओली पोप एकही धाव न काढता रवी अश्विनचा बळी ठरला. जो रूट 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला. जॉनी बेअरस्टोने 30 धावा केल्या. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स 4 धावा करून कुलदीप यादवचा बळी ठरला. तर बेन फॉक्सने 17 धावा केल्या. इंग्लंडच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. त्यामुळे इंग्लिश संघ अवघ्या 145 धावांवर गारद झाला. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर १९२ धावांचे लक्ष्य आहे. पण रांचीच्या विकेटवर ज्या पद्धतीने चेंडू फिरत आहे, ते पाहता टीम इंडियासाठी आव्हान सोपे नसेल.
इतर महत्वाच्या बातम्या