एक्स्प्लोर
Advertisement
रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीला पुन्हा ब्रेक
मुंबई: भारताचा फलंदाज रोहित शर्माच्या कसोटी कारकीर्दीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. रोहितची दुखापत गंभीर असल्याची माहिती मिळते आहे. त्याला शस्त्रक्रियेलाही सामोरं जावं लागू शकतं, अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या वन डे मालिकेदरम्यान रोहितच्या मांडीचे स्नायू दुखावले होते. त्यावर उपचारासाठी आणि काही तपासण्या करून घेण्यासाठी रोहित इंग्लंडला जाणार असून, त्याला सहा ते आठ आठवडे विश्रांती घ्यावी लागू शकते, असं प्रसाद यांनी म्हटलंय.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी काल भारतीय संघाची घोषणा झाली.
भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मानं इंग्लडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियात पुनरागमन केलंय. भारताचा दिग्गज सलामीवीर गौतम गंभीर तसंच युवा फलंदाज करूण नायर आणि गोलंदाज जयंत यादवनंही पंधरा जणांच्या भारतीय संघात आपलं स्थान कायम राखलं आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्याचा भारतीय संघात समावेश झाला आहे. दरम्यान रोहित शर्मा अजूनही दुखापतीतून सावरलेला नसल्यानं त्याला भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
गांगुली म्हणतो आता इंग्लंडला व्हाईटवॉश द्या, तर वॉन म्हणतो..
भारत विरुद्ध इंग्लंड, संपूर्ण वेळापत्रक
मुरली विजयसोबत सलामीला कोण?
ईशांत शर्माचं पुनरागमन, रोहित शर्माला विश्रांती
‘धोनीला कर्णधारपदावरुन हटवलं, तर भारताची ती मोठी चूक ठरेल’
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement