IND vs SA 1st T20: पराभवानंतर पंतच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, विराटच्या विक्रमाशी बरोबरी
India vs South Africa T20 Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्याच्या मालिकेला सुरुवात झाली आहे.
India vs South Africa T20 Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्याच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टी20 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने यजमान भारताचा सात गड्यांनी पराभव केला. पहिल्या टी 20 सामन्याआधीच भारताला मोठा धक्का बसला होता. केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे पाच सामन्याच्या मालिकेला मुकलाय. त्यामुळे पहिल्या सामन्यात भारतीय संघाची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर सोपवण्यात आली. ऋषभ पंत भारतीय टी 20 संघाचा आठवा कर्णधार होय. पण ऋषभ पंतच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पराभव झालाय. यासह पंतच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. विराट कोहलीनेही पहिल्या सामन्यात कर्णधारपद स्वीकारल्यानंतर भारताचा पराभव झाला होता. या नकोशा विक्रमाशी पंतने बरोबरी केली.
विराटच्या पहिल्या सामन्यात पराभव -
टी20 मध्ये दक्षिण अफ्रीकाविरोधात 2006 मध्ये वीरेंद्र सेहवागने पहिल्यांदा भारतीय संघाचं नेतृत्व केले होते. वीरेंद्र सेहवाग हा पहिला टी 20 चा कर्णधार होय. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. सेहवाहनंतर धोनी, विराट आणि रोहित शर्मा यांनीही भारतीय संघाचं नेतृत्व सांभाळलेय. आतापर्यंत सात खेळाडूंनी भारताच्या टी 20 संघाचे कर्णधारपद सांभाळलेय. यामध्ये विराट कोहलीला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. सेहवाग, एमएस धोनी, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी कर्णधारपद सांभाळल्यानंतर पहिला सामना जिंकलाय.
धोनीने पाकिस्तानचा केला होता पराभव -
धोनी भारताचा दुसरा टी 20 कर्णधार होय. विश्वचषक 2007 मध्ये धोनीने स्कॉटलँडविरोधात नेतृत्व सांभाळले होते. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर धोनीने पाकिस्तानविरोधात भारतीय संघाचं नेतृत्व केले. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. सुरेश रैनाने 2010 मध्ये झिम्बाब्वेविरोधात 3 टी20 सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केले होते. ही मालिका भारताने जिंकली होती. अजिंक्य रहाणे, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी कर्णधारपद स्वीकारल्यानंतर पहिल्या सामन्यात भारताचा विजय झाला होता.