एक्स्प्लोर
लग्नापूर्वीच सासरच्यांकडून जाडेजाला 95 लाखांची ऑडी भेट
राजकोट : टीम इंडियाचा शिलेदार रवींद्र जाडेजाला लग्नाआधीच सासरच्या मंडळींकडून ऑडी कार भेट मिळाली आहे. जाडेजाचं लग्न 17 एप्रिल रोजी रिवा सोळंकीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
सोळंकी कुटुंबियांनी जाडेजाला ऑडीच्या क्यू सेव्हन या आलिशान कारची भेट दिली. या कारची किंमत 95 लाख रुपये असून जाडेजा आणि त्याची भावी पत्नी रिवाबाने राजकोटच्या शोरुममधून ती कार ताब्यात घेतली.
रवींद्र जाडेजाला ऑडी कारचा आधीपासूनच शौक आहे. त्यातच सासरच्या मंडळींनी दिलेल्या अनपेक्षित भेटीने त्याचा चेहरा चांगलाच खुलला होता.
पाहा काय म्हणाला जाडेजा?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement