एक्स्प्लोर
Advertisement
तो माझा शेवटचा सामना असेल: अश्विन
अश्विनने आपल्याला कधीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचं आहे, कधी निवृत्ती घेणार, याबाबतची घोषणा केली आहे.
मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने मोठा निर्णय जाहीर केला आहे. अश्विनने आपल्याला कधीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचं आहे, कधी निवृत्ती घेणार, याबाबतची घोषणा केली आहे.
अश्विनने अद्याप निश्चित तारीख जाहीर केली नाही, पण कसोटी क्रिकेटमध्ये 618 विकेट घेतल्यानंतर निवृत्ती घेईन, असं अश्विनने सांगितलं.
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या (619) नावावर आहे.
अश्विनसाठी कुंबळे हा आयडॉल आहे. त्यामुळे कुंबळेच्या पुढे न जाता त्याचे मागे म्हणजेच 618 विकेट जेव्हा घेईन, तो माझा शेवटचा कसोटी सामना असेल, असं अश्विन म्हणाला.
अश्विन नेमकं काय म्हणाला?
कुंबळेच्या सर्वाधिक विकेट्सच्या विक्रमाकडे तुझी नजर आहे का, अशी विचारणा अश्विनला करण्यात आली.
त्यावर अश्विन म्हणाला, “अजिबात नाही. मी कुंबळेचा मोठा प्रशंसक, फॅन आहे. कुंबळेचे 619 विकेट्स आहेत आणि जर माझ्या नावे 618 विकेट जमा झाल्या, तर त्याचवेळी मी निवृत्ती घेईन”.
सध्या अश्विनच्या नावे किती विकेट?
सध्या अश्विनने 52 कसोटी सामन्यात 25.26 च्या सरासरीने 292 विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत अश्विन पाचव्या स्थानावर आहे.
या यादीत अनिल कुंबळे (619), कपिल देव (434), हरभजन सिंह (417), झहीर खान (311) यांच्यानंतर अश्विनचा नंबर आहे.
वन डेत स्थान न मिळाल्याने नाराज नाही
दरम्यान, अश्विनला यावेळी वन डे संघात स्थान न मिळाल्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर अश्विन म्हणाला, “कोणत्याही खेळाडूला विश्रांती देणं किंवा संघात घेणं हे त्याच्या हातात नसतं. माझ्या मते, येणारा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी उत्तम असेल. मी दररोज माझ्या खेळात सुधारणा करत आहे. पहिल्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे. मला संधी मिळाली, तर मी माझी सर्वोत्तम कामगिरी करेन”
सध्या अश्विनला भारताच्या वन डे आणि टी ट्वेण्टी संघात स्थान मिळालेलं नाही. अश्विन शेवटचा वन डे सामना 30 जून 2017 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध, तर शेवटचा टी टेण्टी सामना 9 जुलै 2017 रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच खेळला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
Advertisement