एक्स्प्लोर
कसोटी रँकिंगमध्ये अश्विन दुसऱ्या स्थानी कायम

मुंबई: भारताच्या रवीचंद्रन अश्विननं गोलंदाजांच्या जागतिक कसोटी क्रमवारीत दुसरं स्थान कायम राखलं आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत अश्विनचा अपवाद वगळता एकाही भारतीय गोलंदाजाला टॉप टेनमध्ये स्थान मिळालेलं नाही. गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड 872 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर अश्विन 871 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत इंग्लंडचाच जेम्स अँडरसन 854 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ अव्वल स्थानावर, तर इंग्लंडचा ज्यो रुट दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर आफ्रिकेचे फलंदाज हाशिम आमला चौथ्या आणि एबी डिव्हिलियर्स सहाव्या स्थानी आहेत. या यादीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. अष्टपैलूंमध्ये रवीचंद्रन अश्विननं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. तर या यादीत रवींद्र जाडेजा सहाव्या क्रमांकावर आहे.
आणखी वाचा























