(Source: Poll of Polls)
'एक दिवस आकाशात एकत्र फुटबॉल खेळू'; स्टार खेळाडू पेले यांची मॅराडोना यांना अनोखी श्रद्धांजली
पेले आणि मॅराडोना एकमेकांच्या खेळाचं नेहमीच कौतुक करायचे. दोघांच्या वयात दोन दशकांचं अंतर होतं. परंतु, त्यांच्यातील नातं मैत्रिचं होतं. फुटबॉलचा खेळ रंगतदार करण्यासाठी या दोघांच्याही योगदानाचं संपूर्ण जगाने कौतुक केलं आहे आणि या दोघांनी एकमेकांच्या धमाकेदार खेळीचं.
Diego Maradona : 'एक दिवस आकाशात कुठेतरी मॅराडोनासोबत फुटबॉल खेळीन'; असं म्हणत ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांनी अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलर मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पेले यांचं नाव अनेकदा 'फुटबॉलचा बादशाह' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅराडोना यांच्यासोबत घेतलं जातं. दरम्यान, मॅराडोना यांचं बुधवारी हृदयविकाऱ्याच्या झटक्यानं निधन झालं.
पेले यांनी ट्वीट केलं आहे की, 'अत्यंत दुखद वृत्त आहे. मी एक चांगला मित्र आणि जगतील एक महान खेळाडू गमावला आहे. खूप काही बोलायचं आहे, परंतु, सध्या एवढंच म्हणतो की, ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो. आशा आहे की, एक दिवस आम्ही आभाळात एकत्र फुटबॉल खेळू.' पेले आणि मॅराडोना एकमेकांच्या खेळाचं नेहमीच कौतुक करायचे. दोघांच्या वयात दोन दशकांचं अंतर होतं. परंतु, त्यांच्यातील नातं मैत्रिचं होतं. फुटबॉलचा खेळ रंगतदार करण्यासाठी या दोघांच्याही योगदानाचं संपूर्ण जगाने कौतुक केलं आहे आणि या दोघांनी एकमेकांच्या धमाकेदार खेळीचं.
Que notícia triste. Eu perdi um grande amigo e o mundo perdeu uma lenda. Ainda há muito a ser dito, mas por agora, que Deus dê força para os familiares. Um dia, eu espero que possamos jogar bola juntos no céu. pic.twitter.com/6Li76HTikA
— Pelé (@Pele) November 25, 2020
फिफाने मॅराडोना यांना 2001मध्ये ब्राझीलचे स्टार फुटबॉलर पेले यांच्यासोबत फुटबॉलच्या इतिहासातील महान खेळाडूंमध्ये सहभागी केलं होतं. विश्वचषक 1986मध्ये इंग्लंड विरुद्धच्या क्वॉर्टर फायनलमध्ये मॅराडोना यांनी केलेल्या गोल्सना हँड ऑफ गॉड आणि गोल ऑफ द सेंचुरी नावाने ओळखलं जातं. जे आतापर्यंतच्या सर्वोत्तम गोल्समध्ये मोजले जातात. अनेक वर्षांनी मॅराडोना यांनी कबुली दिली होती की, मी जाणूनबुजून गोलला हात लावला होता. त्याच सामन्यात मॅराडोना यांनी आणखी एक गोल डागला तो गोल फिफाने विश्वचषकाच्या इतिहासातील महान गोल असल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. अर्जेंटिनाच्या मीडियाने याबाबत माहिती दिली. मॅराडोना यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मॅराडोनाच्या अनेक चाचण्या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आल्या. एका स्कॅनमध्ये मेंदूत ब्लड क्लोट होण्याची बाब उघडकीस आली. यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवसांपूर्वी मॅराडोना यांची कोरोना टेस्ट देखील झाली होती. परंतु, त्याचा अहवाल निगेटिव्ह आली. 30 ऑक्टोबरला मॅराडोना यांनी आपला 60 वा वाढदिवस साजरा केला. ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी गेलेल्या मॅराडोना यांना उच्च जोखमीचा रुग्ण म्हणून पाहिले जात होते.
महत्त्वाच्या बातम्या :