Vinesh Phogat vs Babita Phogat : कुस्ती सोडल्यानंतर विनेश उतरणार राजकारणाच्या आखाड्यात? आगामी निवडणुकीत बहिणीच्या विरोधात ठोकणार शड्डू
Vinesh Phogat vs Babita Phogat : महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आता राजकारणात उतरण्याची दाट शक्यता आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्राने दावा केला आहे की, कुस्तीपटू विनेश फोगाट आगामी हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
Vinesh Phogat vs Babita Phogat Haryana Assembly : महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आता राजकारणात उतरण्याची दाट शक्यता आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्राने दावा केला आहे की, कुस्तीपटू विनेश फोगाट आगामी हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. याआधी विनेश फोगाटने सक्रिय राजकारणात येण्यास नकार दिला होता, परंतु ताज्या मीडिया रिपोर्टनुसार, काही राजकीय पक्ष तिला निवडणूक लढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशचे हुकले पदक
विनेशची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या फ्रीस्टाइल 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकण्याची संधी हुकली, कारण 100 ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आले. 17 ऑगस्ट रोजी विनेशचे राष्ट्रीय राजधानीत आणि सोनीपतमधील बलाली गावात जोरदार स्वागत करण्यात आले. मात्र, विनेश कोणत्या पक्षात सामील होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.
जवळचा मित्र काय म्हणाला?
2024 च्या ऑलिम्पिकनंतर विनेशच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारले असता, फोगाट कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी ANI ला सांगितले की, कदाचीत आगामी हरियाणा निवडणूकीत विनेश फोगाट विरुद्ध बबिता फोगाट या बहिणींमध्ये आणि बजरंग पुनिया विरुद्ध योगेश्वर दत्त असे चित्र दिसू शकते. पण, जर विनेश राजकारणात प्रवेश करणार असेल, तर कोणत्या पक्षात प्रवेश करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विमानतळावर जल्लोषात स्वागत
विनेश विमानतळाच्या बाहेर येताच, पहाटेची वेळ असूनही मोठ्या संख्येने जमलेल्या तिच्या चाहत्यांनी, कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तिचे जोरदार स्वागत केले. जबरदस्त पाठिंबा आणि प्रेम यामुळे ती भावूक झाली. गेल्या वर्षी कुस्तीतून निवृत्त झालेली साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी विनेशचे स्वागत केले.