(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tokyo Olympic, Day 3 Preview : तिसर्या दिवशी भारतीय खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा; सिंधू आणि मेरी कोम सज्ज
भारताची स्टार बॉक्सर मेरी कॉम रविवारी सकाळी महिला बॉक्सिंग फ्लायवेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रिंगमध्ये उतरणार आहे. पीव्ही सिंधू देखील ग्रुप लीगचा पहिला सामना खेळण्यासाठी कोर्टमध्ये उतरेल.
Tokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिकचा दुसरा दिवस भारतासाठी 'रुपेरी' ठरला. सैखोम मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देण्याची कामगिरी केली. मीराबाईनं वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पहिलं रौप्यपदक जिंकलं आहे. मीराबाई चानूनं 49 किलोग्राम महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं. तिसर्या दिवशी भारतीय खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा आहे.
तिसऱ्या दिवसाची भारताची सुरुवात काहीशी निराशाजनक झाल्याचं दिसून आलं. महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये मनु भाकर आणि यशस्विनी सिंह देसवाल यांच आव्हान संपुष्टात आलं आहे. महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये मनु भाकर अंतिम फेरीत प्रवेश करु शकली नाही. तिचं ऑलिम्पिकमधील आव्हान क्वालिफाइंग राउंडमध्येच संपुष्टात आलं. यशस्विनी सिंह देसवालही या स्पर्धेत अंतिम सामन्यात आपलं स्थान बनवू शकली नाही.
भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम रविवारी सकाळी महिला बॉक्सिंग फ्लायवेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रिंगमध्ये उतरेल. पीव्ही सिंधू देखील ग्रुप लीगचा पहिला सामना खेळण्यासाठी कोर्टमध्ये दिसेल.
हॉकी गटातील लीग सामन्यात न्यूझीलंडला 3-2 ने पराभव करुन भारतीय खेळाडू रविवारी ऑस्ट्रेलियाविरूद्ध मैदानात उतरतील. भारतीय महिला आणि पुरुष टेबल टेनिसपटू रविवारी दुसर्या फेरीतील सामन्यांमध्ये खेळतील.
महिला टेनिसमध्ये सानिया मिर्झा आणि अंकिता रैना पहिल्या फेरीच्या सामन्यात खेळण्यासाठी कोर्टवर असतील. तर जिम्नॅस्टिक्समधील प्रणती नायक आणि स्विमिंगमधील सज्जन प्रकाश आणि श्रीहरी नटराज टोकियोमध्ये पदकासाठी खेळताना दिसतील.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून दिलेल्या मीराबाईची पहिली प्रतिक्रिया
टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. मीराबाई चानूनं दिलं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात तिनं रौप्यपदक मिळवलं आहे. मीराबाई चानूनं पदक जिंकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पदक मिळाल्यानं खूप आनंदी आहे. माझ्या देशासाठी पदक जिंकल्याचा जास्त आनंद आहे. संपूर्ण देशवासियांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. काहीशी दडपणाखाली होते मात्र सर्वोत्तम कामगिरी करण्याचा निर्धार मी केला होता. त्यासाठी खूप कष्टही घेतले, असं मीराबाई चानूनं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :