Mirabai Chanu Wins Medal: ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक, मीराबाई चानूनं जिंकलं रौप्यपदक
Mirabai Chanu Wins Medal: टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. मीराबाई चानूनं दिलं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे.
Mirabai Chanu Wins Medal: टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. मीराबाई चानूनं दिलं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात तिनं रौप्यपदक मिळवलं आहे. मीराबाई चानूनं शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर क्लीन अॅंड जर्कमध्ये मीराबाई चानूनं 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं. मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरं पदक मिळवून दिलं आहे. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.
पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती कोविंद यांच्यासह दिग्गजांकडून मीराबाईवर कौतुकाचा वर्षाव
वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनगटात चीनच्या जजिहूला सुवर्णपदक मिळालं आहे. मीराबाईनं भारताला मिळवून दिलेल्या पहिल्या पदकानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह दिग्गज नेत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी मीराबाईसोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. अवघा भारत मीराबाईच्या कामगिरीनं आनंदी आहे. भारोत्तोलनमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचं अभिनंदन. तिचं यश प्रत्येक भारतीयांना प्रेरीत करेल, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
Could not have asked for a happier start to @Tokyo2020! India is elated by @mirabai_chanu’s stupendous performance. Congratulations to her for winning the Silver medal in weightlifting. Her success motivates every Indian. #Cheer4India #Tokyo2020 pic.twitter.com/B6uJtDlaJo
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2021
तीरंदाजी- क्वार्टर फायनलमध्ये दीपिका-प्रवीण जोडी पराभूत
ऑलिम्पिकमध्ये तीरंदाजी स्पर्धेत दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव या जोडीनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र या जोडी सेमीफायनलमध्ये पोहोचता आलं नाही.
सौरभ चौधरी 10 मीटर एअर पिस्टलच्या फायनलमध्ये
10 मीटर एअर पिस्टल (पुरुष) स्पर्धेत सौरभ चौधरीनं जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. सौरभ चौधरीनं 10 मीटर एअर पिस्टलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. सौरभ चौधरीने 586 स्कोअर केला आहे. भारताचा अभिषेक वर्मा मात्र फायनलमध्ये पोहोचू शकला नाही.
लावेनिल वालारिवन, अपूर्वी चंडेलाचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात
टोकियो ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर्स एअर रायफल नेमबाजीत भारताची इलावेनिल वालारिवन 16 व्या, तर अपूर्वी चंडेला 36व्या स्थानावर राहिली. दोघींचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आलं आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी सुरुवात, न्यूझीलंडवर 3-2नं मात
भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली आहे. न्यूझीलंडवर 3-2 अशी मात करत भारतानं विजयी आरंभ केला आहे. भारतीय संघानं शेवटच्या क्वार्टरमध्ये आपली आघाडी कायम ठेवत शानदार विजय मिळवला आहे. हरमनप्रीतनं भारताकडून दोन गोल केले तर एक गोल रुपेंद्रनं केला. आता रविवारी भारताची लढत ऑस्ट्रेलियासोबत असणार आहे.
टेबल टेनिस- मिक्स्ड डबल्समध्ये भारताचं आव्हान संपुष्टात
टेबल टेनिसच्या मिक्स्ड डबल्स स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताची मनिका बत्रा आणि शरत कमल ही या जोडीला चीनच्या ताइपे जोडीनं मात दिली.
पहिलं सुवर्णपदक चीनच्या नावे
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक चीनच्या खात्यात गेलं आहे. 10 मीटर एअर रायफलमध्ये चीननं सुवर्णपदक मिळवलं आहे. चीनची यांग कियान हिनं 251.8 स्कोअर करत गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे. यांग कियाननं हा स्कोर करत ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड देखील केलं आहे.