(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ISSF World Cup : नेमबाज राही सरनोबतचा 'सुवर्ण' वेध, विश्वचषकात भारताला पहिलं सुवर्णपदक
फ्रान्सच्या मटिल्डा लामोयेनं 31 गुणांसह रौप्यपदक कमावलं तर रशियाच्या व्हिटालिना बातसारास्किना 28 गुणांसह रौप्यपदक मिळवलं. भारताची मनू भाकर सातवी आली.
ओसिएक (क्रोएशिया) : भारतीय नेमबाज राही सरनोबतने सोमवारी आयएसएसएफ विश्वचषकात सूवर्ण कामगिरी केली आहे. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात राहीने सुवर्णपदकावर नाव कोरलं. तर युवा नेमबाज मनु भाकरला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. आयएसएसएफ विश्वचषकात भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे. याआधी भारतीय नेमबाजांनी एक रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली आहेत.
राहीने या स्पर्धेत फायनलमध्ये एकूण 39 गुणांची कमाई केली. फ्रान्सच्या मटिल्डा लामोयेनं 31 गुणांसह रौप्यपदक कमावलं तर रशियाच्या व्हिटालिना बातसारास्किना 28 गुणांसह रौप्यपदक मिळवलं. भारताची मनू भाकर सातवी आली.
GOLD!!! 🥇 @SarnobatRahi wins India’s 1st gold of the #osijek #ISSFWorldCup demolishing the finals field in the Women’s 25M Pistol 🔫 @realmanubhaker finishes 7th @WeAreTeamIndia @ISSF_Shooting #shootingworldcup #indianshootingteam pic.twitter.com/wSJQGQ4B6T
— NRAI (@OfficialNRAI) June 28, 2021
क्वालिफिकेशनमध्ये आज रॅपिड फायर फेरीत सरनोबतने शानदार 296 गुणांची कमाई केली. रविवारी प्रिसिजनमध्येही तिने चांगली कामगिरी करत 295 गुण मिळवले. मनू भाकर 588 गुणांसह क्वालिफायर फेरीत तिसऱ्या स्थानावर होती. तिने रॅपिड फायरमध्ये 296 आणि प्रीसिशनमध्ये 292 गुण मिळवले. मात्र निराशाजनक 11 गुणांसह अंतिम सामन्यातून ती लवकर बाहेर पडली. शूट-ऑफमध्ये ती बल्गेरियाच्या व्हिक्टोरिया चाकाकडून हरली.
फायनलमध्ये राहीचा दबदबा
राही सरनोबतने क्वालिफायर फेरीपासून फायनल शूटिंगपर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केलं. क्वालिफायरमध्ये राहीने 591 गुणे मिळवत दुसर्या स्थानावर राहिली. सुवर्णपदकासाठी राहीचा सामना फ्रान्सच्या मटिल्डा लामोयेसोबत होता. फायनलमध्ये राहीने आपली कामगिरी सुधारली आणि 5-5 शॉट्सच्या 10 सीरिजमध्ये सर्वाधिक 39 गुण मिळवले. राही आधीपासूनचं 6 अंकांनी पुढे होती आणि तिचे सुवर्णपदक निश्चित झाले होते. शेवटच्या सीरिजमध्ये राहीने 4 अचूक लक्ष्य साधलं आणि 39 गुणांसह सुवर्णपदक जिंकलं. फायनलच्या तिसर्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या सीरिजमध्ये राहीने पूर्ण गुण मिळवले.
यंदाच्या या विश्वचषकात राहीशिवाय सौरभ चौधरीनं पुरुषांच्या 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात कांस्यपदक मिळवलं होतं. सौरभ आणि मनू भाकरनं 10 मीटर एयर पिस्टल मिश्र नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं होतं. तर महिलांच्या 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात मनू, राही आणि यशस्विनी देसवालनं सांघिक कांस्यपदक मिळवलं होतं.