Paris Olympics 2024: भारताने आज पुन्हा कांस्य पदकावर कोरलं नाव; नेमबाज मनू भाकर अन् सरबज्योतसिंगने रचला इतिहास
Paris Olympics 2024: 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला हे पदक मिळाले आहे.
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) मनू भाकर (Manu Bhaker) आणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने इतिहास रचला आहे. 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताने कांस्य पदक जिंकलं आहे. तसेच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर पहिली आणि एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने दुसरे पदक जिंकले आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी दक्षिण कोरियाच्या ली वोंहो आणि ओ ये जिन या जोडीचा 16-10 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला हे पदक मिळाले आहे. मनू भाकरचे हे दुसरे ऑलिम्पिक पदक आहे.
🇮🇳🔫 𝗟𝗜𝗩𝗘 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘: #Shooting - Mixed team 10m Air Pistol (Final)
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 30, 2024
- INDIA HAVE DONE IT!!! BRONZE NO. 2
👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗮𝘁𝗵𝗹𝗲𝘁𝗲𝘀 𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗣𝗮𝗿𝗶𝘀 𝗢𝗹𝘆𝗺𝗽𝗶𝗰𝘀 𝟮𝟬𝟮𝟰!… pic.twitter.com/Tf8EPcxwTN
भारताची पाच फेरीत आघाडी-
पहिली फेरी-
भारत- 18.8
दक्षिण कोरिया-20.5
दुसरी फेरी-
भारत-21.2
दक्षिण कोरिया- 19.9
तिसरी फेरी-
भारत- 20.8
दक्षिण कोरिया- 19.8
चौथी फेरी-
भारत- 20.7
दक्षिण कोरिया- 20.5
पाचवी फेरी-
भारत- 20.1
दक्षिण कोरिया- 19.5
सहावी फेरी-
भारत- 20.2
दक्षिण कोरिया-20.6
BRONZE MEDAL!!!!!
— Team India (@WeAreTeamIndia) July 30, 2024
Incredible shooting from Manu Bhaker and Sarabjot Singh to win us our Second medal at @paris2024 Olympic Games. With this Manu also becomes the first Indian athlete to win 2 Olympic Medals in a single edition! #JeetKaJashn | #Cheer4Bharat | #IndiaAtParis24 pic.twitter.com/C6rIy3hNIj
वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्टलमध्येही मनू भाकरचं कांस्य पदक
पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत (Paris Olympics 2024) भारताच्या मनू भाकरने (Manu Bhaker) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली होती.
कोण आहे मनू भाकर?
22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.
संबंधित बातमी:
Photos: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच नेटकऱ्यांना मनू भाकरची भुरळ; ग्लॅमरस लूकची रंगली चर्चा