एक्स्प्लोर

जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली

Nashik News : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात एका महिलेने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

Nashik News : एक ना अनेक संशयास्पद घटनांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (Nashik Civil Hospital) शनिवारी एका महिलेने पाच दिवसांचे बाळ पळवल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा एक धक्कादायक घटना जिल्हा शासकीय रुग्णालयात उघडकीस आली आहे. रुग्णालयाच्या आवारात एका महिलेने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एक महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रुग्णालयाच्या आवारातील झाडाला गळफास घेत महिलेने स्वतःचे आयुष्य संपवलं आहे. कविता अहीवळे असे महिलेचे नाव आहे. महिलेने गळफास घेतल्यानंतर रुग्णालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली. महिलेने आत्महत्या का केली? यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

नाशिक जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत

घटनेची माहिती मिळताच पोलीस नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. सरकारवाडा पोलिसांकडून महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा सुरु आहे. बाळ चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या काही तासातच नाशिक जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. 

नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी

दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयात  (Nashik Civil Hospital) शनिवारी धक्कादायक घटना उघड होती. पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळाच्या मातेशी ओळख वाढवत संशयित महिलेने ऐन डिस्चार्जच्या वेळी मातेच्या डोळ्यांदेखत बाळ चोरी करून पळ काढला होता. महिलेचे हे कृत्य काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. यानंतर पोलिसांनी चौकशी करुन बाळाचा व महिलेचा शोध सुरु केला होता. हे बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना (Nashik Police) यश आले असून चोरी गेलेलं बाळ अवघ्या काही तासात पोलिसांनी आईच्या कुशीत पोहोचवले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Nashik Crime : जुन्या वादातून भरदिवसा शीर धडावेगळं केलं; छाटलेलं मुंडके अन् कुऱ्हाडीसह आरोपी सख्खे भाऊ पोलीस स्थानकात हजर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik TCS Crime: TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानला अखेर अटक; मोबाईलसह महत्त्वाचे तांत्रिक पुरावेही जप्त, विदेशी फंडिंगसह इंटरनॅशनल कनेक्शन?
नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानला अखेर अटक; मोबाईलसह महत्त्वाचे तांत्रिक पुरावेही जप्त, विदेशी फंडिंगसह इंटरनॅशनल कनेक्शन?
नाशिक TCS प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर, 20 दिवसांपासून फरार आरोपी निदा खानला अटक
नाशिक TCS प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर, 20 दिवसांपासून फरार आरोपी निदा खानला अटक
Video: संजय राऊत संतापले, म्हणाले, इथं धर्मध्वज फडकवता अन् सीता-समान माता-भगिनींना मारहाण करता
Video: संजय राऊत संतापले, म्हणाले, इथं धर्मध्वज फडकवता अन् सीता-समान माता-भगिनींना मारहाण करता
Sanjay Raut: शेतकरी महिलांच्या अश्रूंचा हिशेब मागण्यासाठी संजय राऊत मैदानात; नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा, प्रांताधिकारी गायब, राऊत ठाण मांडूनच बसले
शेतकरी महिलांच्या अश्रूंचा हिशेब मागण्यासाठी संजय राऊत मैदानात; नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा, प्रांताधिकारी गायब, राऊत ठाण मांडूनच बसले

व्हिडीओ

Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC Result 2026 Exam: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
SSC Exam Result 2026 : दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार! राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार;  वाचा A टू Z माहिती
दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार! राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार; वाचा A टू Z माहिती
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
Embed widget