(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi Mementos: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटवस्तूंच्या ई-लिलावात नीरज चोप्राच्या 'सुवर्ण' भाल्यासाठी सर्वाधिक बोली
पंतप्रधान नरेंद्र मेदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावामध्ये नीरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक बोली लागली आहे. नीरज चोप्राच्या भाल्यासाठी सर्वाधिक 1.5 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती.
PM Modi Mementos: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावासाठी गुरुवारी शेवटचा दिवस होता. सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ई-लिलाव गुरुवारी संध्याकाळी संपुष्टात आला. ई-लिलावात पंतप्रधान मोदींना मिळालेल्या धार्मिक कलाकृतींनी बरेच लोक आकर्षित केले आहेत.
ई-लिलावात टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक बोली लागल्याचे सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले. असे सांगण्यात येत आहे की ज्या भाल्याने नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याने तो पंतप्रधान मोदी यांना भेट म्हणून दिला होता.
नीरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक 1.5 कोटींची बोली लागली. त्याचवेळी सरदार पटेल यांच्या पुतळ्यासाठी सर्वाधिक 140 वेळा बोली लावण्यात आली. यासह लाकडापासून साकारलेल्या गणेशमूर्तीसाठी 117 वेळा बोली लावण्यात आली. तर 104 वेळा बोली, पुणे मेट्रो लाइनच्या स्मृतीचिन्हांसाठी आणि विजय मशालच्या स्मृतीचिन्हांसाठी 98 वेळा बोली लावण्यात आली.
17 सप्टेंबरपासून बोली सुरू झाली
पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव 17 सप्टेंबरला सुरू झाला आणि गुरुवारी संध्याकाळी संपला. पीएम मेमेंटोस वेबसाईटनुसार, नीरज चोप्राने वापरलेल्या भाला, ज्याने त्याला सुवर्णपदक मिळवून दिले, त्याला सर्वाधिक बोली मिळाली आहे. वेबसाईटनुसार, त्याची मूळ किंमत 1 कोटी होती. यासाठी अंतिम बोली 1.5 कोटी रुपये होती.
नीरज चोप्राचा इतिहास
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. ट्रॅक आणि फील्ड अॅथलेटिक्समध्ये भारताकडून पदक जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे. टोकिया ऑलिम्पिकमध्ये नीरजनं 87.88 मीटर भाला फेकत ऐतिहासिक कामगिरी केली. तब्बल 13 वर्षानंतर, म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलंच सुवर्ण पदक आहे. तर वैयक्तिक प्रकारात भारतासाठी हे केवळ दुसरं सुवर्ण पदक आहे.
ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट असणारा नीरज चोप्रा हा मूळचा पानिपत, हरियाणाचा आहे. अंजू बॉबी जॉर्ज नंतर जागतिक चॅम्पियनशिप स्तरावर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आहे. नीरजने 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.23 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते. 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने 82.23 मीटर भालाफेक करुन सुवर्णपदक जिंकले आणि भारतीय राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली. नीरजने 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.23 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने 86.47 मीटर भाला फेकून स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते.