पुण्यातील आर्मी स्टेडियमचे नाव आता 'नीरज चोप्रा स्टेडियम'; संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते होणार नामकरण सोहळा
भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून पुण्यातील आर्मी स्टेडियमला नीरज चोप्राच नाव दिलं जाणार आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सोमवारी हा नामकरण सोहळा पार पडणार आहे.

पुणे : ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू नीरज चोप्राच्या कारकीर्दीत आता आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून पुण्यातील आर्मी स्टेडियमला नीरज चोप्राच नाव दिलं जाणार आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सोमवारी हा नामकरण सोहळा पार पडणार आहे. त्याचबरोबर टोकिओ ऑलिम्पिकमधे पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचा यावेळी सत्कारही करण्यात येणार आहे.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह सोमवारी सकाळी पुण्यात येणार आहेत. ते आधी लष्कराच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या संस्थेच्या सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणार असून त्यानंतर संध्याकाळी चार वाजता आर्मी स्टेडीयमचा नामकरण सोहळा होणार आहे.
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. ट्रॅक आणि फील्ड अॅथलेटिक्समध्ये भारताकडून पदक जिंकणारा तो पहिला खेळाडू आहे. टोकिया ऑलिम्पिकमध्ये नीरजनं 87.88 मीटर भाला फेकत ऐतिहासिक कामगिरी केली. तब्बल 13 वर्षानंतर, म्हणजे 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलंच सुवर्ण पदक आहे. तर वैयक्तिक प्रकारात भारतासाठी हे केवळ दुसरं सुवर्ण पदक आहे.
ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट असणारा नीरज चोप्रा हा मूळचा पानिपत, हरियाणाचा आहे. अंजू बॉबी जॉर्ज नंतर जागतिक चॅम्पियनशिप स्तरावर अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय आहे. नीरजने 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.23 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले होते. 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने 82.23 मीटर भालाफेक करुन सुवर्णपदक जिंकले आणि भारतीय राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली. नीरजने 2017 च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 85.23 मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने 86.47 मीटर भाला फेकून स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
