एक्स्प्लोर

Chhatrasal Stadium Murder Case | ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीस

ज्युनियर पैलवान सागर धनखडच्या हत्ये प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथकं रवाना झाली असून तो अद्याप हाती लागलेला नाही.

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडच्या मृत्यू प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप सुशील कुमारवर आहे. त्याच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांची पथकं रवाना झाली आहे. परंतु तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सुशील कुमार परदेशात पसार झाला असावा असा संशय पोलिसांना आहे. देशाच्या सर्व विमानतळांवर ही माहिती देण्यात आली. 

देशाची राजधानी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये 4 मे रोजी पैलवानांमध्ये झालेल्या हाणामारीत माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडचा मृत्यू झाला होता. त्याच्या हत्येमध्ये सुशील कुमारचा सहभाग असल्याचा आरोप आहे. सागरच्या हत्येनंतर सुशील कुमार आपल्या साथीदारांसह उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पळून गेल्याचं म्हटलं जात होतं. त्याचं अखेरचं मोबाईल लोकेशन हरिद्वारमध्ये सापडलं आहे. त्यानंतर मात्र त्याचा फोन बंद येत आहे. तो नेपाळमध्ये पळाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे नेपाळच्या सीमेवरही बंदोबस्त आणि चौकशी वाढवली आहे. 

मारहाणीचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती
मारहाणीचा व्हिडीओही पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्या दिवशी हत्या झाली, त्याच रात्री पोलिसांनी यामध्ये सहभागी असलेला एक आरोपी प्रिन्स दलालला अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी आणखी दहा आरोपींची ओळख पटवली होती. परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणात सुशील कुमारचे सासरे आणि द्रोणाचर्च पुरस्कार विजेते सतपाल सिंह तसंच मेहुणार लव सहरावत यांची अनेक तास चौकशी केली होती. पोलिसांनी सुशील कुमारच्या सासऱ्यांकडे त्याच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणांबाबत विचारणा केली होती. परंतु त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. 

बहुतांश लोकांचा सुशील आणि त्याच्या साथीदारांविरोधात जबाब : पोलीस
वायव्य दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त डॉ. गुरइकबाल सिंह सिद्धू यांच्या सांगितलं की, "आम्ही सतपाल सिंह आणि लव सहरावत यांची मॉडेल टाऊन पोलीस स्टेशनमध्ये बोलावून चौकशी केली. आम्ही सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. तपासात आम्हाला समजलं की स्टेडियमच्या पार्किंगमध्ये सुशील कुमार, अजय, प्रिन्स दलाल, सोनू महाल, सागर आणि अमित यांच्या कथितरित्या वाद झाला. पोलिसांना या मारहाणीचा व्हिडीओ देखील सापडला आहे. यामध्ये मारहाणीत सामील असलेले लोक दिसत आहेत. याशिवाय पोलिसांनी स्टेडियममध्ये काम करणाऱ्या डझनभर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली आहे. यामध्ये बहुतांश लोकांनी सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांविरोधात जबाब दिला आहे."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget