एक्स्प्लोर

Paris Olympics : अखेरपर्यंत लढला पण पदक थोडक्यात हुकलं, अर्जुन बबुतासह कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न भंगलं

Arjun Babuta : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अर्जुन बबुतानं अंतिम फेरीत धडक दिली होती. त्याच्याकडून भारताला दुसरं पदक मिळेल अशी आशा होती.

पॅरिस : भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) मनू भाकरनं कांस्यपदक मिळवून दिल्यानंतर भारताच्या नजरा आणखी एका पदकाकडे लागल्या होत्या. 10 मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात अर्जुन बबुतानं (Arjun Babuta) अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आज अर्जुन बबुतानं 10 मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात पदकाच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, अर्जुन बबुता चौथ्या स्थानी राहिल्यानं कांस्य पदक थोडक्यात हुकलं. 

अर्जुन बबुतानं पात्रता फेरीत 630.1 गुण मिळवत अंतिम फेरीत पोहोचला होता. अर्जुन बबुता सातव्या स्थानावर असल्यानं त्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. 

अर्जुन बबुता हा मूळचा चंदीगडचा असून भारतीय संघाचा तो 2016  पासून सदस्य आहे. आशियाई नेमबाजी स्पर्धेत विजय मिळाल्यानंतर अर्जुन बबुतानं ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला होता.  अर्जुन बबुता हा पंजाबच्या जलालाबाद येथील गावातून येतो. अर्जुन बबुताचं गाव भारत आणि पाकिस्तानच्या सीमेजवळ आहे. अर्जुनचं कुटुंब वडिलांच्या कामानिमित्त चंदीगडमध्ये पोहोचलं. अर्जुननं बीएचं शिक्षण डीएव्ही कॉलेजमधून केलं होतं. 

नेमबाजीत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या अभिनव बिंद्रा यांच्या सल्ल्यानुसार कर्नल जे.एस. धिल्लोन यांनी अर्जुनला मार्गदर्शन केलं. अर्जुन बबुता त्यानंतर एअर रायफल शुटिंगकडे वळला.  अर्जुननं 2013 मध्ये चंदीगड राज्य शुटिंग स्पर्धा जिंकली होती. 

बॅडमिंटन महिला दुहेरीमध्ये भारताच्या  अश्विनी पोनप्पा आणि तनीषा क्रास्तो यांना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या जोडीला जपानच्या नामी मतसुयामा आणि चिहारा शिदा यांनी 21-11 आणि 21-12 नं पराभूत केलं. 

मनू भाकर भारताला दुसरं पदक मिळवून देणार?

मनू भाकरनं भारताला 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्यपदक मिळवून दिलं होतं. मिश्र दुहेरी 10 मीटर एअर पिस्टल क्रीडा प्रकारात उद्या  मनू भाकर आणि सरबजीत यांना कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे.   याशिवाय 25 मीटर पिस्टल क्रीडा प्रकारात मनू भाकर 2 ऑगस्टला सहभागी होणार आहे. मनू भाकर आणि सरबजीत यांनी पदक जिंकल्यास एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकवून देणारी पहिली खेळाडू ठरु शकते.

दरम्यान, थोड्याच वेळात भारत आणि अर्जेंटिना यांच्यात हॉकीची मॅच होणार आहे. भारतानं पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. आज भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी होतो का ते पाहावं लागणार आहे. 

संबंधित बातम्या :

Photos: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच नेटकऱ्यांना मनू भाकरची भुरळ; ग्लॅमरस लूकची रंगली चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Virat Kohli Video : रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
Guillain Barre Syndrome : जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
Union Budget 2025 Video: इन्कम टॅक्स... अर्थमंत्र्यांची संसदेत घोषणा; पंतप्रधान मोदींनी दणादण वाजवला बाक, अमित शाहांनी काय केलं?
Video: इन्कम टॅक्स... अर्थमंत्र्यांची संसदेत घोषणा; पंतप्रधान मोदींनी दणादण वाजवला बाक, अमित शाहांनी काय केलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis On Union Budget :  मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट, आर्थिक इतिहासातला मैलाचा दगडUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : नव्या करप्रणालीत मोठे बदल, बजेटबाबात सोप्या भाषेत विश्लेषणUnion Budget 2025 : Nirmala Sitharaman Full Video:निर्मला सीतारामन यांच्या मोठ्या घोषणा, संपूर्ण बजेटUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman on Income Tax Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजारांवरून १ लाखपर्यंत वाढवली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Virat Kohli Video : रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
Guillain Barre Syndrome : जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
Union Budget 2025 Video: इन्कम टॅक्स... अर्थमंत्र्यांची संसदेत घोषणा; पंतप्रधान मोदींनी दणादण वाजवला बाक, अमित शाहांनी काय केलं?
Video: इन्कम टॅक्स... अर्थमंत्र्यांची संसदेत घोषणा; पंतप्रधान मोदींनी दणादण वाजवला बाक, अमित शाहांनी काय केलं?
Income Tax Budget: 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री, स्वप्नातही विश्वास न बसणारी गोष्ट, निर्मला अक्कांनी करुन दाखवली!
मध्यमवर्गीय नोकरदारांना लक्ष्मी खरोखरच पावली! 12 लाखांचं उत्पन्न टॅक्स फ्री, कोणाचाच विश्वास बसेना
Union Budget 2025 : कोणतीही निवडणूक नाही, तरीही लाखापासून 15 लाखांपर्यंत कमावणारे ते वरिष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात 8 मोठ्या घोषणा!
कोणतीही निवडणूक नाही, तरीही लाखापासून 15 लाखांपर्यंत कमावणारे ते वरिष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पात 8 मोठ्या घोषणा!
Income Tax Slabs 2025 : मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
मध्यमवर्गीयांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! आयकर सूट मर्यादा 12 लाखांवर, इतर फायदेही मिळणार
Union Budget 2025 : आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
आठवडाभरापूर्वी भाजपला टप्प्यात घेत झटका दिला अन् आज बजेटमध्ये नितीशकुमारांनी डाव साधला!
Embed widget