Virat Kohli 50th ODI Century : क्रिकेटमधील देवाच्या साक्षीनं देवाच्या गाभाऱ्यात 'विराट' अध्यायाची सुरुवात; सेमीफायनलच्या महामुकाबल्यात कोहलीचं विश्विविक्रमी 50 वं शतक
विराट कोहलीची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. या सामन्यात त्याने महान सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला.
Kohli ODI Century : क्रिकेटच्या इतिहासात देव मानला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांची बरोबरी केल्यानंतर किंग विराट कोहलीनं आता त्याच्याच साक्षीनं अन् त्याच्याच मैदानावर विश्वविक्रमी 50व्या शतकाची नोंद केली. त्यामुळे क्रिकेट पर्वात विराट अध्यायाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्या मायानगरी मुंबईत क्रिकेटचा देव सचिन मोठा झाला, त्याच मुंबईतील वानखेडे मैदानावर विराटने सचिनच्या साक्षीने विश्वविक्रमी शतक केले.
HISTORY....!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2023
VIRAT KOHLI HAS SCORED MOST RUNS IN A SINGLE EDITION IN 48 YEAR OLD WORLD CUPS. 🐐 pic.twitter.com/EeAZTM5jEZ
CC ODI World Cup 2023 मध्ये विराट कोहलीची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. या सामन्यात त्याने महान सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडित काढला. त्याने विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या. त्याने सचिन तेंडुलकरचा (673 धावा) विक्रम मोडला. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज रिकी पाँटिंगचा विक्रमही मोडित काढला.
Most runs in a single edition in World Cups:
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2023
ODI - Virat Kohli.
T20I - Virat Kohli.
The Greatest of all time. 🐐 pic.twitter.com/Cd71QgTMN2
विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक धावा
- 674* – विराट कोहली (2023)
- 673 - सचिन तेंडुलकर (2003)
- 659 - मॅथ्यू हेडन (2007)
- 648 – रोहित शर्मा (2019)
- 647 - डेव्हिड वॉर्नर (2019)
विराट कोहलीच्या नावावर आता वनडेमध्ये 13705 धावा आहेत. त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगला (13704) मागे टाकले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचे नाव महान सचिन तेंडुलकरचे आहे. या यादीत श्रीलंकेचा कुमार संगकारा दुसऱ्या स्थानावर आहे. वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
Virat Kohli had ZERO 500+ runs in the World Cup edition from 2011 to 2019.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
2023 - broke the record of most runs in a single edition by a batter.
- THE GREATEST EVER COMEBACK....!!!! 🐐 pic.twitter.com/rL1Ml8IIOo
वनडेमध्ये सर्वाधिक धावा
- 18426 - सचिन तेंडुलकर
- 14234 - कुमार संगकारा
- 13705*-विराट कोहली
याशिवाय विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्यात कुमार संगकाराला (216) मागे टाकले. कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 217 अर्धशतकांची नोंद आहे. कोहलीने पाँटिंगची बरोबरी केली असून त्याच्या नावावर 217 अर्धशतके आहेत.
Most runs in a single World Cup edition:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
Virat Kohli - 674*.
Sachin Tendulkar - 673. pic.twitter.com/8yaHImLx8p
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके
- 264 - सचिन तेंडुलकर
- 217 - रिकी पाँटिंग
- 217-विराट कोहली
- 216 - कुमार संगकारा
- 211 - जॅक कॅलिस
विराटने सचिनचा विक्रम मोडला
याशिवाय कोहलीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक अर्धशतके करणारा तो खेळाडू ठरला. त्याने महान सचिन तेंडुलकर (07) आणि शकीब अल हसन (07) यांना मागे टाकले. विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक आठ अर्धशतके ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.
विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक अर्धशतके
- 8 – विराट कोहली (2023)
- 7 – सचिन तेंडुलकर (2003)
- 7– शकिब अल हसन (2019)
- 6 – रोहित शर्मा (2019)
- 6– डेव्हिड वॉर्नर (2019)
इतर महत्वाच्या बातम्या