Kohli ODI Half Century Record : किंग कोहलीनं वानखेडे मैदानात इतिहास घडवला; वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
एकदिवसीय विश्वचषकाच्या बाद फेरीत विराट कोहलीने प्रथमच अर्धशतक झळकावले आहे. त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे 72 वे अर्धशतक आहे. कोहलीने 59 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले.
Kohli ODI Half Century Record : क्रिकेटच्या अध्यायात दिवसागणिक विक्रमांवर विक्रम करत असलेल्या किंग विराट कोहलीने आणखी एक पराक्रम आपल्या नावे केला आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात सलामीवीर नसतानाही सर्वाधिक धावा ठोकण्याचा पराक्रम आपल्या नावे केला आहे. एकाच वर्ल्डकप एडिशनमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्येही कोहली प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा 673 धावांचा विक्रम मोडित काढत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
What a shot by King Kohli.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
A six against Tim Southee. pic.twitter.com/nQKTF7CpsW
विराटने वर्ल्डकपमध्ये 10 पैकी आठ सामन्यात पन्नासहून अधिक धावा केल्या आहेत. यावरून किंग कोहलीचा धमाका दिसून येतो.
HISTORY AT THE WANKHEDE...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
Virat Kohli has most fifty plus scores in a World Cup edition. 🐐 pic.twitter.com/IcQbK37MTU
आजवर विराटने प्रत्येक विक्रम आपल्या नावे केला असला, तरी त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सेमीफायनलमध्ये मोठी खेळी करण्यात अपयश आलं होतं. मात्र, ती कसर सुद्धा विराटने भरून काढली आहे.
FIFTY BY KING KOHLI IN THE SEMI FINALS...!!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
8th fifty plus score in 10 innings in this World Cup - this is simply crazy consistency by the King. He's looking for a big one today. pic.twitter.com/o8HKUVFmDU
त्याने आज न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यात शानदार अर्धशतकी खेळी केली असून तो शतकाकडे वाटचाल करत आहे.
- Fifty vs 🇦🇺
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2023
- Fifty vs 🇦🇫
- Hundred vs 🇧🇩
- Fifty vs 🇳🇿
- Fifty vs 🇱🇰
- Hundred vs 🇿🇦
- Fifty vs 🇳🇱
- Fifty vs 🇳🇿
- Kohli has 6 fifties & 2 hundreds from just 10 innings in World Cup 2023. pic.twitter.com/nrfQrQ4ddc
एकदिवसीय विश्वचषकाच्या बाद फेरीत विराट कोहलीने प्रथमच अर्धशतक झळकावले आहे. त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे 72 वे अर्धशतक आहे. कोहलीने 59 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले.
FIFTY FOR KING KOHLI......!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2023
He is standing tall in the big game, the King, he is moving towards ultimate greatness in ODI format - brilliant fifty against Kiwis at Wankhede. pic.twitter.com/Vjj1593iBt
इतर महत्वाच्या बातम्या