Novak Djokovic : नोवाक जोकोविच पुन्हा ताब्यात; वकिलांनी दिली माहिती
नोवाक जोकोविचला (Novak Djokovic) ऑस्ट्रेलियाने (Australia) दुसऱ्यांदा ताब्यात घेतलं
Novak Djokovic Visa : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचला (Novak Djokovic) ऑस्ट्रेलियाने (Australia) दुसऱ्यांदा ताब्यात घेतलं. जोकोविचच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. जोकोविचला कोर्टाच्या सुनावणी आधी ताब्यात घेण्यात आले. कोरोना प्रतिबंधक लस न घेता जोकोविच ऑस्ट्रेलियामध्ये राहू शकेल की नाही हे कोर्टाचा आदेश आल्यावर समजणार आहे.
नोवाक जोकोविचनं कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. ज्यामुळं समुदायाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असं मत मांडत ऑस्ट्रेलियाचं इमिग्रेशन मंत्री अॅलेक्स हॉल यांनी जोकोविचचा व्हिसा रद्द केला होता.
जोकोविचच्या वकिलानं सरकारच्या या निर्णयाला तर्कहीन म्हणत कोर्टामध्ये या विरूद्धात याचिका केली. जोकोविच हा सोमवारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होणार आहे. जर जोकोविच या स्पर्धेत 10 व्यावेळी जिंकतो, तर तो दहा वेळा ही स्पर्धा जिंकणारा पहिला खेळाडू ठरेल. जोकोविच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो की नाही, हे कोर्टामध्ये रविवारी होण्याऱ्या सुनावणीवर हे अवलंबून असणार आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोवाक जोकोविच मेलबर्न वि्मानतळावर पोहोचला होता. तत्पूर्वीत्यानंतर जोकोविचला विमानतळावर काही तास थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर देशात प्रवेशासंबंधी आवश्यक कागदपत्रं सादर न केल्यामुळं त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला, अशी माहिती एएनआयने दिली होती.
हे देखील वाचा-
Novak Djokovic Visa: ऑस्ट्रेलियाकडून टेनिसपटू नोवाक जोकोविचचा व्हिसा दुसऱ्यांदा रद्द
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha