एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित वन डे सामन्यांपूर्वी राष्ट्रगीत नाही!
आंतरराष्ट्रीय सामन्याची सुरुवात प्रत्येक देशाच्या राष्ट्रगीताने होते. मात्र श्रीलंकेतील एका नियमानुसार उर्वरित सामन्यांमध्ये उभय देशांचं राष्ट्रगीत गायलं जाणार नाही.
कॅण्डी : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डेपूर्वी तुम्हाला राष्ट्रगीत ऐकायला मिळालं नाही, तर आश्चर्यचकीत होऊ नका. कारण श्रीलंकेतील एका नियमामुळे उर्वरित सर्व वन डे सामने सुरु होण्यापूर्वी उभय देशाचं राष्ट्रगीत गायलं जाणार नाही.
आंतरराष्ट्रीय सामन्याची सुरुवात प्रत्येक देशाच्या राष्ट्रगीताने होते. मात्र भारत आणि श्रीलंका यांच्यातील उर्वरित वन डे सामन्यांपूर्वी राष्ट्रगीत गायलं जाणार नाही. श्रीलंका क्रिकेट संघाचे माध्यम व्यवस्थापक दिनेश रत्नसिंघम यांनी याबाबत माहिती दिली.
भारत आणि श्रीलंका संघांमधला दुसरा वन डे सामना उद्या (गुरुवार) कॅण्डीच्या पल्लिकल स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. मात्र श्रीलंकेत असा नियम आहे की, कोणत्याही मालिकेच्या केवळ पहिल्याच सामन्यात उभय देशांचं राष्ट्रगीत गायलं जातं.
दरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही पहिल्या कसोटीनंतर दोन्ही देशांचं राष्ट्रगीत गाण्यात आलं नाही. आता वन डेतही त्याचप्रमाणे उर्वरित सामन्यांमध्ये राष्ट्रगीत गायलं जाणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement