एक्स्प्लोर
नितीन मेनन आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचं अंपायरिंग करणार
नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी रणजी खेळाडू नितीन मेनन लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायरिंग करताना दिसण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने मेनन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अंपायर पॅनेलसाठी नॉमिनेट केलं आहे.
32 वर्षीय नितीन मेनन हे एस. रवी यांच्यानंतर दुसरे भारतीय असणार आहेत, जे सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणार आहेत. रवी 2002 सालानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर अंपायरिंग करणारे पहिले भारतीय बनले होते.
नितीन मेनन यांनी आतापर्यंत 40 फर्स्ट क्लास मॅच, 32 लिस्ट ए मॅच आणि 21 टी-20 सामन्यांची अंपायरिंग केली आहे.
क्रिकेटर म्हणून नितीन मेनन यांनी 2004 साली मध्य प्रदेशातून पदार्पण करत दोन लिस्ट ए मॅच खेळल्या होत्या. त्यानंतर अंपायरिंगमध्ये आपलं नशीब आजमावू लागले आणि 2009 मध्ये रणजी सामन्यांचं अंपायरिंग करण्यासाठी मेनन मैदानात उतरले.
रणजीसोबतच ईराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि इंडिया ए स्पर्धांमध्ये नितीन मेनन यांनी अंपायरिंग केली आहे. नितीन यांनी 2015-2016 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या होम टुर्नामेंट शेफीलिड शिल्डमध्येही अंपायरिंग केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement