एक्स्प्लोर
सायनाने सिडनीत फडकावला तिरंगा

सिडनीः भारताची फुलराणी सायना नेहवालनं सिडनीत भारताचा तिरंगा फडकावला आहे. सायनाने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरीजचं विजेतेपद मिळवलं आहे. सिडनीत झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायनानं हा विक्रम आपल्या नावावर केला. सायनाने चीनच्या सून यूवर 11-21, 21-14, 19-21 अशी मात केली. सायनाचं हे बीडब्ल्यूएफ स्पर्धांमधलं एकूण 22 वं विजेतेपद ठरलं आहे. तर सुपर सीरीज दर्जाच्या स्पर्धांमध्ये सायनाचं हे दहावं विजेतेपद आहे. रिओ ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरीजमधला सायनाचा हा विजय भारतीय चाहत्यांचा उत्साह वाढवणारा ठरला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
नागपूर
व्यापार-उद्योग























