एक्स्प्लोर
मलिंगाच्या जागी मुंबई इंडियन्समध्ये 'या' क्रिकेटपटूची वर्णी
मुंबई : मुंबई इंडियन्सच्या संघातील दुखापतग्रस्त खेळाडू मलिंगाच्या जागी नवा भिडू येण्यास सज्ज झाला आहे. वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज जेरॉम टेलर आयपीएलच्या सिझनमध्ये मलिंगाची जागा घेणार आहे.
जेरॉम यापूर्वीच्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि पुण्याच्या संघाकडून खेळला होता. औपचारिक करारपत्र पूर्ण झाल्यानंतर टेलर मुंबई इंडियन्सकडून खेळेल.
मुंबई इंडियन्सच्या वैद्यकीय पथकानं केलेल्या चाचणीत लसिथ मलिंगा अनफिट असल्याचं आढळून आलं होतं. मलिंगाच्या डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आणखी चार महिने सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला मुंबई इंडियन्सच्या वैद्यकीय पथकाने दिला आहे. त्यामुळे मलिंगाला श्रीलंका संघाच्या इंग्लंड दौऱ्यातून आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमधूनही माघार घ्यावी लागत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement