एक्स्प्लोर

MotoGP India Debut : आता भारतातही मोटो जीपीचा थरार, 2023 मध्ये होणार आयोजन; Bharat Grand Prix असणार नाव

Bharat Grand Prix : भारतात ग्रेटर नोएडाच्या बुद्ध इंटरनेशनल सर्किट येथे ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे. भारत पहिल्यांदाच या शर्यतीचं यजमानपद भूषवणार आहे.

Moto GP : जगातील सर्वात प्रसिद्ध अशी बाईक शर्यत असणाऱ्या मोटो जीपी (Moto GP) स्पर्धांचा थरार आता भारतात अनुभवता येणार आहे. ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट (Buddh International Circuit) याठिकाणी पुढील वर्षी पहिल्या-वहिल्या मोटो ग्रँड प्रिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसचे आयोजन करण्यात आलं आहे. याला 'भारतीय ग्रँड प्रिक्स' (Bharat Grand Prix) असं नाव देण्यात आलं आहे. फेडरेशन इंटरनॅशन दे मोटरसायकल (Fédération Internationale de Motocyclisme) अर्थात FIM ने त्यांचे व्यावसायिक भागीदार डोर्ना स्पोर्ट्स (Dorna Sports) सोबत बुधवारी (21 सप्टेंबर) नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात याबाबतची घोषणा केली. FIM, Dorna Sports आणि नोएडा येथील Fairstreet Sports यांच्यामदतीने पुढील 7 वर्षांच्या कालावधीसाठी भारत ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या स्पर्धेत 19 देशांतील स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यामुळे एक भव्य स्पर्धा होणार असल्याने देशात रोजगाराच्या संधी नक्कीच उपलब्ध होतील. तसंच देशातील पर्यटन आणि व्यवसायालाही चालना मिळणार आहे. बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे मोटो ग्रँड प्रिक्स शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे. याठिकाणीच फॉर्म्युला वन इंडियन ग्रांड प्रिक्स 2011 ते 2013 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. परंतु आर्थिक अडचणींमुळे पुढे जाऊन स्पर्धा रद्द करण्यात आली होती. पण आता मोटो जीपी स्पर्धा याठिकाणीच पार पडणार आहेत. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे होणार्‍या मोटो ग्रँड प्रिक्सबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "उत्तर प्रदेशसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे यूपीमधील पर्यटन क्षेत्राला देखील चालना मिळणार आहे. यासोबतच यूपीला जागतिक व्यासपीठही नक्कीच मिळेल.

मोटो जीपी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021 मध्ये फॅबियो चॅम्पियन

दरम्यान मोटो जीपी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021 या स्पर्धेमध्ये, यामाहा मोटो जीपी संघाचा फॅबियो क्वाटारो चॅम्पियन बनला. तसंच डुकाटी संघाच्या फ्रान्सिस्को बागनायाने दुसरे स्थान पटकावले. तर जोन मीर याने तिसरे स्थान पटकावले. 

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget