एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mithali Raj : मिताली राजचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे.
मुंबई : भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. तिने आजवरच्या कारकीर्दीत तीन टी-20 विश्वचषकांसह 21 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्त्व केलं आहे. मितालीने 89 टी-20 सामन्यांमध्ये 37.52 च्या सरासरीने 2 हजार 364 धावांचा रतीब घातला आहे. यामध्ये तिच्या 17 अर्धशतकांचा समावेश आहे. एका भारतीय महिला फलंदाजाची टी-20 मधली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावा करणारी मिताली राज पहिली भारतीय फलंदाज ठरली होती. विशेष म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांच्याही आधी मितालीने 2 हजार धावांचा टप्पा पार केला होता. भारतातर्फे टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या मितालीच्याच नावावर आहे.
मिताली राजने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी 2021 सालचा वन डे विश्वचषक तिचं सध्याचं लक्ष्य असल्याचे तिने सांगितले आहे.
विश्वचषकात भारताचीच बाजी, मिताली राजला विश्वास | मुंबई | ABP MajhaBREAKING: Mithali Raj calls curtains on an illustrious T20I career! pic.twitter.com/iNfcSbdeHM
— ICC (@ICC) September 3, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
शेत-शिवार
मुंबई
Advertisement