एक्स्प्लोर

महाराष्ट्र केसरीसाठी दोस्तीत कुस्ती, सख्खे मित्र फायनलमध्ये भिडणार

अभिजीत हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पठ्ठ्या आहे, तर किरण पुण्यातल्याच कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा शिलेदार आहे.

पुणे : पुणे शहरचा अभिजीत कटके की, साताऱ्याचा किरण भगत? कोण होणार 2017 सालचा महाराष्ट्र केसरी? उभ्या महाराष्ट्रातल्या लाखो कुस्तीशौकिनांना सध्या याच प्रश्नाच्या उत्तराची उत्सुकता लागून राहिलीय. पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भूगावात आज सायंकाळी त्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. पण तोवर महाराष्ट्राच्या गावागावात महाराष्ट्र केसरीचाच विषय चवीचवीनं चघळला जाईल. आपणही त्या निमित्तानं अभिजीत कटके आणि किरण भगत या दोन्ही पैलवानांच्या ताकदीचं मूल्यमापन करुया. अभिजीत कटके आणि किरण भगत हे दोघंही एकाच वयाचे म्हणजे बावीस वर्षांचे आहेत. पण या वयातही त्या दोघांनीही महाराष्ट्राच्या कुस्तीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मॅटवरचा मातब्बर पैलवान विरुद्ध मैदानी कुस्तीचा हिरो अभिजीत कटके हा मॅटवरचा मातब्बर पैलवान बनू पाहतोय. तो सलग दुस-यांदा मॅट विभागाची फायनल जिंकून, महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्तीसाठी पात्र ठरलाय. किरण भगतनं मैदानी कुस्तीचा हीरो म्हणून महाराष्ट्रात आज आपला ठसा उमटवलाय. त्यानं माती विभागाची फायनल जिंकून, पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीसाठी लढण्याचा मान मिळवला आहे. महाराष्ट्र केसरीसाठी दोस्तीत कुस्ती, सख्खे मित्र फायनलमध्ये भिडणार (मॅटवरचा मातब्बर पैलवान अभिजीत कटके) अभिजीतचं वजन या घडीला तब्बल 122 किलो आहे, त्या तुलनेत किरणचा वजन काटा हा 103 किलोवरच अडकतो. अभिजीत हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पठ्ठ्या आहे, तर किरण पुण्यातल्याच कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा शिलेदार आहे. अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाडांचं मार्गदर्शन लाभलंय, तर किरण हा काका पवार आणि नामदेव बडरे यांनी घडवलेला पैलवान आहे. महाराष्ट्र केसरीसाठी दोस्तीत कुस्ती, सख्खे मित्र फायनलमध्ये भिडणार (मैदानी कुस्तीचा हीरो किरण भगत) अभिजीतनं 2015 साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. 2016 साली त्यानं ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मिळवला होता. अभिजीतला गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरीत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पण जमखंडीतल्या भारत केसरी किताबानं त्याच्यात नवा जोश भरलाय. किरण भगतनं गेल्या काही वर्षांत  गावोगावची  कुस्ती मैदानं जिंकून आपल्या गाठीशी प्रचंड अनुभव बांधून घेतला आहे. कुंडलच्या मैदानात तर त्यानं ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला हरवण्याचा भीमपराक्रम गाजवला होता. वयाच्या बाविशीतही अभिजीत एक परिपक्व पैलवान म्हणून ओळखला जातो. त्याचा बचाव आधीपासूनच भक्कम होता. पण आता त्याच्या आक्रमणालाही धार चढल्याचं दिसून येत आहे. किरण भगतही वयाच्या बाविशीत भलताच परिपक्व झालाय. तो आक्रमक तर आधीपासूनच आहे. पण समोरचा प्रतिस्पर्धी पाहून रणनीती आखण्यात आणि प्रतिस्पर्ध्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्यातही किरण माहिर आहे. ही झाली अभिजीत कटके आणि किरण भगतची एकास एक तुलना, पण महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती ही मॅटवर होत असल्याचा फायदा अभिजीतला होईल, असा त्याच्या चाहत्यांचा दावा आहे. किरण भगतचे चाहते तो दावा खोडून काढतात. किरण मॅटवरही तितक्याच ताकदीनं खेळतो, अशी साक्ष त्याचे चाहते देतात. महाराष्ट्र केसरीसाठी दोस्तीत कुस्ती, सख्खे मित्र फायनलमध्ये भिडणार (सख्खे दोस्त, पक्के पैलवान) अभिजीत आणि किरण यांच्यातल्या कुस्तीची चर्चा महाराष्ट्रभर रंगलेली असताना 'एबीपी माझा'ला मिळालेली रंजक माहिती आहे ती त्यांच्या दोस्तीची. अभिजीत आणि किरणमधल्या दोस्तीची साक्ष देणारा फोटोच आम्ही सोबत देत आहोत. सोनीपतच्या राष्ट्रीय शिबिरात ही दोस्ती जमली. एकच वय आणि आवडनिवडही कुस्तीचीच. त्यामुळं त्यांच्यातली दोस्ती आणि कुस्तीही बहरली. अभिजीत आणि किरण आज जितके सख्खे दोस्त आहेत, तितकेच ते दोघं पक्के पैलवानही बनलेयत. त्यांच्यातला पैलवान त्या दोघांनाही महाराष्ट्र केसरीसाठी चांगली कुस्ती नक्कीच करायला लावेल. पण अभिजीत आणि किरणचं एकमेकांसाठीचं भावनिक नातं इतकं हळवंय की आयुष्यात आपल्यातल्या दोस्तीत ते कुस्ती मात्र कधीच करणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL News : हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
AUS vs BAN 2nd Test : 229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
AUS vs BAN 2nd Test : स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget