एक्स्प्लोर
Advertisement
लोकेश राहुलची ICC क्रमवारीत मोठी झेप !
मुंबई : टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज लोकेश राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत शानदार कामगिरी केली. या कामगिरीनंतर लोकेश राहुलने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
राहुलनं कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत 57 व्या स्थानावरून थेट अकरावं स्थान गाठलं आहे. त्याच्या खात्यात सध्या 739 गुण जमा आहेत.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठीच्या चार कसोटी सामन्यांमध्ये लोकेश राहुलनं सहा अर्धशतकांसह एकूण 393 धावांचा रतीब घातला होता.
या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा चेतेश्वर पुजारा कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत 846 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली 818 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
अजिंक्य रहाणेचं रँकिंगही वधारलं असून, रहाणेत आता कसोटी फलंदाजांमध्ये चौदाव्या स्थानावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं 941 गुणांसह आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं आहे.
न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या आणि इंग्लंडचा ज्यो रूट तिसऱ्या स्थानावर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
हिंगोली
Advertisement