एक्स्प्लोर
Shreyas Iyer Injury : शेवटच्या ऑस्ट्रेलिया सामन्यात उपकर्णधार श्रेयस अय्यर झाला जखमी अजूनही उपचार सुरूच!
Shreyas Iyer Injury : सामन्यात फिल्डिंगदरम्यान संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला, वाचा पूर्ण बातमी
Shreyas Iyer Injury
1/8

Shreyas Iyer Injury Update: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 168 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला क्लीन स्वीपपासून वाचवले.
2/8

मात्र, या सामन्यात फिल्डिंगदरम्यान संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर श्रेयस अय्यर पुन्हा मैदानात आलाच नाही. त्याला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते.
3/8

यादरम्यान आता श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
4/8

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरला बरगडीला दुखापत झाली होती. सध्या श्रेयस अय्यरला सिडनीच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
5/8

बरगडीच्या दुखापतीमुळे अजूनही अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी श्रेयस अय्यरला भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
6/8

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावत चांगली कामगिरी केली. तथापि, श्रेयस अय्यरची सध्याची प्रकृती पाहता पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.
7/8

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल. पहिला एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल, त्यानंतर दुसरा 3 डिसेंबर रोजी आणि तिसरा 6 डिसेंबर रोजी होईल.
8/8

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. तथापि, भारताची घरच्या मैदानावर ही मालिका असल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळण्याची अपेक्षा आहे.
Published at : 27 Oct 2025 03:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























