एक्स्प्लोर
Bachchu Kadu Morcha: 'मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करू', बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात नागपुरात (Nagpur) मोठे आंदोलन सुरू आहे. 'आज दुपारी बारा वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करण्याचा इशारा' बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे. आंदोलकांनी नागपूर-वर्धा आणि जबलपूर-हैदराबाद महामार्ग अडवल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. नागपूरजवळील जामठा स्टेडियमजवळ (Jamtha Stadium) आंदोलक ठिय्या मांडून आहेत. सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केले असल्याचा आरोप करत, मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे रोको करण्याचा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला योग्य FRP, कांद्याला किमान भाव आणि दुधाला दरवाढ या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या आंदोलनामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















