Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Cyclone Montha Name : हिंदी महासागरातील उत्तर भागात जी चक्रीवादळं निर्माण होतात त्यांना नावे देण्यासाठी 13 देशांची एक समिती आहे. त्या देशांच्या क्रमानुसार पुढच्या चक्रीवादळाचे नाव निश्चित केले जाते.

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ या चक्रीवादळाने (Cyclone Montha) आता तीव्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, हे चक्रीवादळ पुढील काही तासांमध्ये पश्चिम किनारपट्टी भागाकडे सरकू शकते. भारतीय हवामान विभागाने ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश किनारपट्टीवरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच मत्स्यव्यवसायिकांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) ने देखील बचाव पथके सज्ज ठेवली आहेत.
Cyclone Montha : ‘मोंथा’ नाव कोणी दिले?
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणाऱ्या चक्रीवादळाला ‘मोंथा’ हे नाव थायलंड या देशाने दिले आहे. थायलंडच्या भाषेत Montha म्हणजे सुगंधी फुल किंवा सुंदर फूल. या नावाने ओळखले जाणारे चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागरात सक्रिय आहे आणि पुढील तासांत ते तीव्र होण्याची शक्यता आहे.
What Is Cyclone : चक्रीवादळ म्हणजे काय?
चक्रीवादळ म्हणजे समुद्रावर निर्माण होणारी एक तीव्र कमी दाबाची प्रणाली, जी गरम पाण्यामुळे वाऱ्यांच्या जोरदार गोल फिरणाऱ्या प्रवाहात परिवर्तित होते.
साधारणतः समुद्राचे तापमान 26 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास हवामानातील दाब कमी होऊ लागतो आणि त्या भागात हवा वर ओढली जाते. त्याच्या खालील भागातून पुन्हा गरम हवा वर जाते. हे चक्र सतत चालू राहिल्याने त्या ठिकाणी मोठा भोवरा निर्माण होतो. त्यालाच चक्रीवादळ म्हटलं जातं.
Cyclone Formation Process : चक्रीवादळांची निर्मिती कशी होते?
- समुद्राचे तापमान जास्त असल्याने पाण्याचे बाष्पीभवन वाढते.
- या वाफेच्या ऊर्जेमुळे वरच्या हवेमध्ये दाब कमी होतो.
- कमी दाबाच्या भागाकडे सर्व दिशांनी वारे खेचले जाते.
- पृथ्वीच्या फिरण्यामुळे हे वारे गोलाकार फिरू लागतात.
- ही प्रणाली अधिक बळकट होत गेल्यास त्याचे रुपांतर चक्रीवादळात होते.
How Are Hurricanes Named : चक्रीवादळांना नावे कशी दिली जातात?
हिंदी महासागरातील (बंगालची खाडी आणि अरबी समुद्र) चक्रीवादळांना नावे देण्याची जबाबदारी World Meteorological Organization (WMO) तसेच ESCAP Panel on Tropical Cyclones या समितीकडे आहे. या समितीत भारतासह एकूण 13 देश आहेत. भारत, बांग्लादेश, म्यानमार, मालदीव, श्रीलंका, पाकिस्तान, थायलंड, इराण, सौदी अरब या देशांचा त्यामध्ये समावेश आहे. प्रत्येक देश आपापल्या यादीत 13 नावे सुचवतो. जेव्हा एखादे नवीन चक्रीवादळ निर्माण होते, तेव्हा यादीतील क्रमाने पुढील नाव वापरले जाते. एकदा नाव वापरल्यावर ते पुन्हा वापरले जात नाही.
ही बातमी वाचा:
























